फेमस

26/11 Mumbai Diary : 26/11 च्या हल्ल्यात सरकारी रुग्णालय झालं होतं युद्धभूमी, पहा मुंबई डायरीतून काय दाखलंय

26/11 चा हल्ला यावर वेगळ्या पद्धतीने मुंबई डायरी 26/11 वेबसिरीज ओटीटी वर प्रदर्शित होत आहे.

26/11 Mumbai Diary : मुंबईतील 26/11 चा हल्ला कोणाला माहीत नाही, असा कोणी नाही. त्या रात्री घडलेले भयानक दृश्य हे अनेक सिनेमांच्या माध्यमातून मांडले आहे. अशीच एक डायरी आता रिलीज होत आहे. 26/11 चा हल्ला यावर वेगळ्या पद्धतीने मुंबई डायरी 26/11 वेबसिरीज ओटीटी वर प्रदर्शित होत आहे. या सिरीजचे निर्माते निखिल आडवाणी आणि निखिल गोन्साल्विस एक आकर्षक वैद्यकीय थ्रिलर या सिरीजच्या माध्यमातून दर्शकांसमोर मांडत आहेत.(The government hospital was turned into a battlefield during the 26/11 attacks, see what is shown in the Mumbai diary)

ही सिरीज सरकारी रुग्णालयाच्या दृष्टिकोनातून मांडली आहे, एक सरकारी दवाखाना कशी युद्धभूमी बनते, हे मांडण्याचा यातून प्रयत्न केला आहे.

26/11 ही तारीख प्रत्येक मुंबईकरांच्या मनात कोरलेली आहे. कारण हाच तो दिवस, ज्या दिवशी मुंबई शहर एका भयानक हल्ल्याची शिकार झाले होते. तसेच एक पत्रकार म्हणून, ज्यांनी 26/11 चा दहशतवादी हल्ला कव्हर केला तेही तीन दिवस न थांबता. त्यांनीही खूप मेहनत केली होती.

दिग्दर्शक निखिल आडवाणी आणि निखिल गोन्साल्विस यांनी मांडलेल्या कथेत त्यांनी सर्व घडलेले दृश्य या सिरीजच्या माध्यमातून सादर केली आहेत. मुंबई पोलिसांच्या चालत्या जीपमधून मेट्रो सिनेमाच्या सिग्नलवर पत्रकारांवर गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांचे सीनही या सिरीजमध्ये जशास तसे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. लेखक (यश छेटीजा, निखिल गोन्साल्विस आणि अनुष्का मेहरोत्रा) यांनी त्यांच्या काल्पनिक पटकथेमध्ये प्रत्यक्ष घडलेले दृश्य दाखवले आहेत.

आणखी एक मनोरंजक पैलू म्हणजे या सिनेमात अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांचे अभिनय व वैद्यकीय शब्दाचा योग्य वापर यामुळे ही सिरीज अधिकच सत्यतेकडे गेल्याचं दिसून येते.

कलाकार मोहित रैना यांनी डॉ. कौशिक ओबेरॉयची भूमिकाही अत्यंत उत्तमपणे साकारली आहे. यात कोंकणा सेन शर्मा ही सामाजिक सेवा संचालक म्हणून भूमिका साकारताना दिसते.

मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, सत्यजीत दुबे यांची भूमिकादेखील अग्रेसर आहे. अनन्या घोष ही टीना देसाईच्या भूमिकेत दिसत आहे. पॅलेस हॉटेलची निडर एफ अँड बी मॅनेजरची भूमिका ती साकरते. तिची उत्तम कामगिरी या सिरीजमध्ये दिसून येते. श्रेया धन्वंतरी ही पत्रकाराच्या भूमिकेत खूप मेहनत करताना दिसते.

या सिरीजची कोरिओग्राफी मोहम्मद अमीन खतीब यांनी केली आहे. त्या हल्ल्याचे कितीही फुटेज लोकांच्या डोक्यात असले तरी सिनेमॅटोग्राफरने आपल्या कौशल्याच्या जोरावर वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न या सिरीजमधून केला आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments