क्राईम

मुंबईत 916 कोटींचा घोटाळा, कोण आहे IDBI Bank ला गंडवणारा विनोद चतुर्वेदी? | ED arrests Vinod Chaturvedi

अनेक बाँकांची काल्पनिक व्यवहारांद्वारे फसवणूक करण्याच्या आरोपाखाली चतुर्वेदीसह, संचालक मनोज पाठक आणि इतरांना ताब्यात घेतलं आहे.

ED arrests Vinod Chaturvedi | अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) 916 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. अंधेरीतील एका कंपनीचे व्यवस्थापक संचालक विनोद चतुर्वेदी यांना अटक केली आहे. न्यायालयाने चतुर्वेदीला पाच दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. अनेक बाँकांची काल्पनिक व्यवहारांद्वारे फसवणूक करण्याच्या आरोपाखाली चतुर्वेदीसह, संचालक मनोज पाठक आणि इतरांना ताब्यात घेतलं आहे.

विनोद चतुर्वेदी हे मनी लाँडरिंगमध्ये आरोपी असल्याची शंका आहे आणि गेल्या शुक्रवारी त्यांच्याकडे मनी ट्रेलचे तपशील मागितल्यावर त्यांनी देण्यास नकार दिल्यामुळे ही अटक झाल्याचे ED च्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार

आरोपींनी 15 शेल कंपन्या स्थापन केल्या आहेत आणि या शेल कंपन्यांच्या माध्यमातून बोगस व्यवहार सुरु आहेत. पहिल्यांदा दुबईत पैसे पाठवायचे नंतर अनेक ग्रृपच्या माध्यमातून ते पैसे आपल्याकडे वळवण्याचे काम चतुर्वेदीसह त्याचे सहकारी करायचे अशी माहिती ED अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या माध्यमातून ED ने ही मनी लाँडरिंगची कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. 2019 मध्ये उशर ऍग्रो लिमिटेड आणि राईस मिलिंग कंपनीच्या प्रवर्तक आणि संचालकांविरोधात आयडीबीआय बँकसह ( IDBI Bank) इतर बँकांनी 916 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला होता.

उशर ऍग्रो लिमिटेड कंपनी ही देशातील मोठ्या तांदूळ कारखानदारांपैकी एक माणली जाते. सध्या हे कार्यालय अंधेरी पश्चिमच्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत (Laxmi Industrial Estate) असल्याची माहिती times of india ने प्रकाशित केली आहे.

असंच काहीसं वंटास वाचा…

Video : Vantas Explainer : Big bull vs Scam 1992 : बीग बूल आणि स्कॅम 1992 मध्ये बीग फरक काय?

दहशतवादी मुंबईत; पण टीप दिल्ली पोलिसांना कशी? काय आहे कारण… | Terrorist in Mumbai

Pari Paswan : मुंबईत माझाही अश्लिल व्हिडीओ बनवला होता, मिस इंडिया युनिव्हर्सचा मोठा आरोप

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments