फेमस

Mumbai : जगातील सर्वात इमानदार शहर, सगळ्यात खालच्या नंबरला पाहा कोणतं शहर… | The Wallet Experiment

महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी बुधवारी ‘द वॉलेट एक्सपेरिमेन्ट’ ने (The Wallet Experiment) दिलेली माहिती शेअर केली आहे. जगातील कोणते शहर सर्वात प्रामाणिक आहे, याबद्दलचा एक सोशल एक्सपेरिमेंट इथे करण्यात आला होता, त्यामध्ये आर्थिक राजधानी मुंबईने दुसरा क्रमांक पटकवला आहे. म्हणजेच मुंबई शहर जगातील सगळ्या शहरांपैकी दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर असल्याचं ‘द वॉलेट एक्सपेरिमेन्ट’ ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.

काय आहे ‘The Wallet Experiment’

रीडर्स डायजेस्ट यांना हे जाणून घ्यायचे होते की, जगातील कोणत्या शहरातील लोक, किती प्रामाणिक आहेत. म्हणून त्यांनी ‘द वॉलेट एक्सपेरिमेंटचा’ सर्व्हे केला आहे. या प्रयोगांतर्गत, रीडर्स डायजेस्ट यांनी जगातील 16 प्रमुख शहरांमध्ये मुद्दामहून स्वत:ची 192 पाकिटे हरवली. म्हणजेच एका शहरात जवळजवळ 12 पाकिटे हरवली.

पाकिटामध्ये 50 डॉलर म्हणजेच साधारण 3,600 रुपये ठेवण्यात आले होते, पैशांसोबतच या सर्व पाकिटांमध्ये एका व्यक्तीचे नाव, त्याचा पत्ता, फोन नंबर, कौटुंबिक फोटो आणि एक ब्युझिनेस कार्ड ठेवण्यात आले होते. हे सगळं केल्यानंतर कोणत्या शहरातून किती पाकीट परत मिळतील, याची वाट पाहण्यात आली.

‘मुंबई’ दुसरे प्रामाणिक शहर

या प्रयोगाच्या माध्यमातून मुंबईत हरवलेली 12 पैकी 9 पाकिटे परत मिळाली होती आणि हे जगातील दुसरे सर्वात प्रामाणिक शहर बनले गेले. त्याचवेळी, फिनलँडमधील हेलसिंकी शहरामधून 12 पैकी 11 पाकिटे, आहे त्या परिस्थितीत परत मिळाली होती. त्यामुळे हेलसिंकी शहरातील नागरिकांना सर्वात प्रामाणिक म्हणून घोषित करण्यात आले, तर मुंबई हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रामाणिक शहर म्हणून घोषित करण्यात आले.

त्याच वेळी, न्यूयॉर्क आणि बुडापेस्टमध्ये 12 पैकी 8 पाकीट परत आली, मॉस्को आणि आम्सटरडॅममध्ये 7, बर्लिन आणि लुब्लजनामध्ये 6, लंडन आणि व्हर्सायमध्ये 5 पाकिटे परत करण्यात आली होती.

प्रमाणिक शहरांच्या यादीत पोर्तुगालच्या लिस्बन शहराचा नंबर लागतो. 12 पैकी फक्त 1 पाकीट या शहरातून परत आले होते. अशा प्रकारे ते शहर प्रमाणिक शहरांच्या यादीत अगदी शेवटच्या क्रमांकावर पोहचले गेले. ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमध्ये स्वित्झर्लंडमधील ज्यूरिख आणि रोमानियामधील बुखारेस्ट, झेक प्रजासत्ताकच्या प्रागमध्ये 3 आणि स्पेनच्या माद्रिदमध्ये 12 पैकी 2 पाकिटे परत करण्यात आली आहेत.

मंहिद्रांनी केलं ट्विट

ही माहिती शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत मुंबईकरांचं कौतुक केलं आहे. मुंबईचं हे कौतुक आश्चर्यकारक नाही, कारण जर प्रत्येक देशाच्या उत्पन्नाच्या सापेक्ष विचार केला तर मुंबईचा परिणाम याच्यापेक्षा आणखी प्रभावी असू शकतो, असे मत महिंद्रा यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments