नॅशनल

Apple Iphone 13: लवकरच एपल नवीन सिरीज लाँच काय आहे वैशिष्ट्ये

आता मुंबईत लवकरच Apple iPhone 13 सीरीज लवकरच लाँच होणार आहे.

Apple Iphone 13 :आज कालच्या जगातील सर्वात जास्त लोकप्रिय असलेला फोन ब्रँड ऍपल आहे, . तर आता मुंबईत लवकरच Apple iPhone 13 सीरीज लवकरच लाँच होणार आहे. अशात, लाँचच्या आधीच या फोनची काही फीचर्स समोर आली आहे. मोठा प्रश्न असा की या सीरिजची किंमत किती असेल.

Apple iPhone 13 सीरीज लाँचसाठी कंपनी कंपनीने एक इव्हेंट करण्याची योजना केली आहे.यासाठी आठवड्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. सदर कार्यक्रमासाठी अॅपलने मीडिया इन्वाइट्सही पाठवायला सुरुवात केली आहे. या इन्वाईटवर california streaming असं लिहीण्यात आले आहे. तर अॅपल पार्कमधून हा इवेंट लाईव्ह टेलिकास्ट करण्यात येईल. कंपनीच्या वेबसाईटवरुनही हा इवेंट उपलब्ध करून दिले आहे.

14 सप्टेंबरला सिरीज लाँच होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले . नवीन iPhone 13 सीरीज अंतर्गत कंपनी iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 Mini बाजारात लाँच करण्यात येणार आहे. पण, लाँचपूर्वीच , iPhone 13 Pro Max च्या व्हेरियंटचे काही डिटेल्स लीक झाले असून यामध्ये स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये समोर आली आहे.

सूत्रानुसार , कंपनी iPhone 13 Pro Max $ 1099म्हणजेच सुमारे 80,679 रुपयांसह लाँच करेल. फोनचा पहिला सेल 24 सप्टेंबरपासून सुरू होणार असून हा स्मार्टफोन पांढरा, काळा आणि (लाल) रंग देखील उपलब्ध करून देण्यात आले . चाहत्यांचा मागणीचा विचार करून हा फोन गुलाबी रंगात देखील उपलब्ध करून दिली जाईल.

iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले , ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz पर्यंत असू शकतो. डिस्प्लेमध्ये आधी छोट्या नॉच दिल्या जातील, फेस आयडी 2.0 नंतर त्यात सादर केला जाऊ शकतो. यामध्ये तीन प्रकार मिळतील, ज्यात 128 GB, 512 GB आणि 1 TB पर्यंत स्टोरेज येईल. कंपनी या मालिकेत आपला खास लेटेस्ट प्रोसेसर A15 Bionic देखील आणत आहे.

या फोनचा जास्त वापर फोटोसाठी केला जातो.फोटोग्राफीसाठी iPhone 13 Pro Max स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. व्हिडीओसाठी, त्यात ProRes फीचर दिले जाऊ शकते. तसेच, फोनमध्ये f / 1.8 अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स दिले जाऊ शकतात. कंपनी या मॉडेलला अॅस्ट्रोफोटोग्राफी मोड देखील देऊ शकते . तर, दुसरीकडे iPhone 13 च्या टॉप मॉडेलमध्ये 4352 mAh ची बॅटरी मिळू शकते, जी 25 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments