फेमस

Asha bhosle :मराठीमधील ज्येष्ठ गायिकेची पुन्हा एकदा मराठी इंडस्ट्रीज मध्ये इंट्री

वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा गाण्यास सुरूवात केली.

Asha bhosle  :अनेक दशकं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आणि आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका(singer)  आशा भोसले . यांनी वयाच्या 88 व्या वर्षी मराठी चित्रपटासाठी पुन्हा गाण्यास सुरूवात केली. संगीताची मेजवानी असलेलं मराठमोळं कुटुंब म्हणजेच मंगेशकर (mangeshkar ) कुटुंब आहे. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून गायनास सुरुवात केली. संगीत विश्वातील प्रत्येक गायकाला आपला आवाज सुरेल ठेवण्यासाठी अपार कष्ट आणि दररोज रियाज करावाच लागतो.

आशाताईंनी मराठी चित्रपटासाठी पुन्हा आवाज दिला आहे.हवाहवाई’ चित्रपटातील एक उडत्या चालीचं गाणं आशाताईंनी गायलं आहे. हवाहवाई’ चित्रपटाची निर्मिती मराठी तारका प्रॉडक्शनच्या महेश टिळेकर आणि नाइंटीनाईन प्रॉडक्शनच्या विजय शिंदे यांनी केली आहे. पंकज पडघन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

आशाताईंनी 1948 मध्ये चुनारिया चित्रपटातून हिंदी चित्रपटांमध्ये गायनाची सुरुवात केली. हंसराज बहल यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी ‘सावन आया’ हे (sawan aya hai ) पहिले गाणे गायले.”आजा आजा मैं हूं प्यार तेरा’ सारखी हजारो सुपरहिट गाणी देणाऱ्या गायिका आशा भोसले यांच्या नावावर अनेक पुरस्कार आणि रेकॉर्ड आहेत. यानंतर त्यांनी आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही, त्यांनी एक हजाराहून अधिक चित्रपटांमध्ये गाणी गायलेली आहेत.आशा भोसले यांनी 2014 मध्ये एका मराठी प्रकल्पासाठी शेवटचे गाणे गायले जेव्हा त्यांनी मिस मॅच (2014) साठी आवाज दिला.

आशा भोसले (asha bhosle ) प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर ( lata mangeshkar) यांची धाकटी बहीण आहेत.आशा भोसले यांनी आपल्या आयुष्यात खूप त्रास सहन केला आहे. अवघ्या 17 वर्षांच्या असताना आशा भोसलेंनी वयाने 16 वर्ष मोठ्या असलेल्या गणपत राव भोसले यांच्याशी लग्न केलं होतं. गणपतराव भोसले हे लता दीदींचे सेक्रेटरी होते. या लग्नामुळे लता दीदी आशा भोसलेंवर नाराज झाल्या होत्या. काही काळ त्या आशा भोसले यांच्याशी बोलत नव्हत्या. परंतु हे लग्न काही टिकले नाही.काही काळानंतर राहुल देव बर्मन म्हणजेच पंचम दाशी लग्न झाले. पंचम दा आशाच्या प्रेमात पडले होते. दोघांनी पहिल्यांदाच थर्ड मंझिलमध्ये एकत्र काम केले होते. बर्मन हे आशाताईंन पेक्षा सहा वर्षांनी लहान होते.

आशाताईंनी शास्त्रीय संगीतासह गझल आणि पॉप संगीत देखील गायले आहे. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नव्हे तर मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मल्याळम, इंग्रजी आणि रशियन भाषांमध्येही गाणी गायली आहेत. त्यांना तब्बल दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तसेच सातवेळा फिल्म फेयर पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.आशा भोसले यांनी जे संगीत क्षेत्रात स्थान मिळवले आहे ते प्रत्येकजण सहजपणे मिळवू शकत नाही.

;

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments