फेमस

Ashi Hi Banwa Banwi : ’70 रूपये वारून’ 33 वर्षे पूर्ण, मानेंचा ‘शुध्द हलकटपणा’ आजही गाजतोय….

23 सप्टेंबर 1988 ला रिलीज झालेला 'अशी ही बनवाबनवी' या लोकप्रिय सिनेमाला आज तब्बल 33 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Ashi Hi Banwa Banwi :तुम्ही मराठीत गाजलेले अनेक सिनेमे पाहिले असतील.काही सिनेमे तर असे आहेत,जे इतक्या वर्षात ही चित्रपटप्रेमींच्या हृदयात घर करून राहिले आहेत, तुमच्या आवडीचा विनोदी चित्रपट व गेल्या अनेक वर्षांपासून त्या सिनेमाचे डायलॉग आजही प्रेक्षकांना तोंडपाठ आहेत.आजच्याच दिवशी महाराष्ट्रभर हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडून लोकप्रियतेच्या शिखरावर चढला. त्या सिनेमातील कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे व अप्रतिम डायलॉग , दिग्दर्शक सचिन पिळगांवकर यांच्या मेहनतीमुळे हा सिनेमा आजही इतका लोकप्रिय आहे.23 सप्टेंबर 1988 ला रिलीज झालेला ‘अशी ही बनवाबनवी’ या लोकप्रिय सिनेमाला आज तब्बल 33 वर्ष पूर्ण झाली आहेत.(’70 rupees warun ’33 years completed, the’ pure weakness’ of the neck is still roaring today ….)

मराठी चित्रपटांचा इतिहास पाहिला तर क्वचित एखाद्या चित्रपटाला असे भाग्य लाभले असेल. आज एवढ्या वर्षातही या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळते आहे.या चित्रपटातील डायलॉग व काही गाजलेले सीन्सचे आजच्या डिजिटल युगात अनेक मिम्सही प्रसिद्ध होताना दिसतात.या चित्रपटाने प्रेक्षकांना आपल्या दुनियेत ओढून घेतले आहे.

अशी ही बनवाबनवी चित्रपटातील अतिशय गाजलेला डायलॉग ज्याने प्रेक्षकांनाही पोट धरून हसायला लावले ते म्हणजे “धनंजय माने इथेच राहतात का?,हा माझा बायको पार्वती,तुम्ही दिलेले 70 रूपये वारले,हा शुध्द हलकटपणा आहे माने” हा डायलॉग आजही तितकाच प्रसिध्द आहे.

या चित्रपटात अनेक गाजलेली गाणी ही प्रेक्षकांच्या खूप आवडीची आहेत.या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत ती म्हणजे ‘हृदयी वसंत फुलताना’,’ही दुनिया मायाजाल’,’अशी ही बनवाबनवी’,’कुणीतरी येणार येणार गं’ ही गाणी पण खूप लोकप्रिय झाली.

आज तब्बल 33 वर्षानंतरही ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमाची क्रेझ लोकांमध्ये कायम आहे. धनंजय माने हे गाजलेले कॅरेक्टर आजही प्रेक्षकांच्या हृदयात तितकेच लोकप्रिय आहे.सचिन पिळगांवकरांनी दिग्दर्शित केलेला व अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे ,सुधीर जोशी यांच्या व बाकीच्या कलाकारांच्या अप्रतिम अभिनयामुळे अशी ही बनवाबनवी सिनेमा गेली अनेक वर्षे आजून सर्वांच्याच मनावर आपले अधिराज्य गाजवेल यात शंकाच नाही.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments