हेल्थ

Ayushman Bharat Digital Mission : पंतप्रधान मोदींनी सुरु केलेले आयुष्यमान भारत डिजीटल मिशन नेमकं काय आहे?

ज्यामुळे डिजिटल हेल्थ इकोसिस्टम अंतर्गत इतर आरोग्य क्षेत्रातील पोर्टलची इंटरऑपरेबिलिटी सक्षम होण्यास मदत होईल.

Ayushman Bharat Digital Mission :राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (NHA) च्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे उद्घाटन करण्यात आले.आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा कार्यक्रम पार पडला,या कार्यक्रमात त्यांनी आयुष्मान भारत डिजिटल मिशनला सुरुवात केली.उद्घाटनांतर त्यांनी देशवासियांना संबोधित केले. या पायलट प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली होती.

सध्या ही मोहीम भारतातील सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवली जाणार आहे.केंद्र सरकारच्या मते, आयुष्मान भारत डिजिटल अभियान एक ऑनलाइन व्यासपीठ असणार आहे.ज्यामुळे डिजिटल हेल्थ इकोसिस्टम अंतर्गत इतर आरोग्य क्षेत्रातील पोर्टलची इंटरऑपरेबिलिटी सक्षम होण्यास मदत होईल.

आयुष्मान भारतच्या डिजिटल मिशनमुळे लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे,तसेच आरोग्याशी संबंधित सर्व माहिती त्यांना एकाच व्यासपीठावर मिळणार आहे. आयुष्मान भारत डिजिटल मिशन या योजनेचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक नागरिकाकडे आता त्यांचा हेल्थ आयडी असणार आहे.या हेल्थ आयडीमध्ये व्यक्तीच्या आरोग्य नोंदींची संपूर्ण माहिती असेल. या हेल्थ आयडीचा सर्वात जास्त उपयोग हा डॉक्टर व रुग्णालयांना होणार आहे. कारण रुग्णांची सर्व माहिती या हेल्थ कार्डमध्ये असेल,यामुळे उपचार देताना डॉक्टरांना रुग्णांच्या आजारांची संपूर्ण माहिती मिळण्यास मदत होईल.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments