स्पोर्ट

ban vs nz 1st t20 : T20 वर्ल्डकपला सुरुवात होण्याआधीच बांग्लादेशचा फॉरमॅटमध्ये कहर…

ban vs nz 1st t20 : आधी कांगारुंना 62 तर आता किवी संघाला केले 60 वर ऑल आऊट. (Bangladesh beat New zealand)

ban vs nz 1st t20 : T20 वर्ल्डकपला सुरुवात होण्यासाठी आता खूप कमी अवधी शिल्लक आहे. (T20 World Cup in October) अशामध्ये सगळे संघ जास्तीत जास्त T20 सामने खेळून, स्वतःचा संघ मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या न्यूझीलँडचा संघ हा बांग्लादेशच्या दौऱ्यावर आहे. (New zealand tour of Bangladesh) तसेच काल झालेल्या पहिल्याच T20 मध्ये बांग्लादेशच्या संघाने सामना अगदी सहजरित्या जिंकून किवींवर वर्चस्व गाजवले आहे. यामुळे बांग्लादेशने 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी अशी आघाडी मिळवली आहे.

या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून न्यूझीलँडचा कर्णधार टॉम लेथमने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु बांग्लादेशच्या गोलंदाजीसमोर कीवीच्या फलंदाजांनी नांगी टाकली आणि न्यूझीलँडचा संघ केवळ 60 धावांवर ऑलआऊट झाला. T-20 मधील न्यूझीलँड संघाचा हा सगळ्यात कमी स्कोअर मानला जातोय. या सामन्यामध्ये मुस्तफिझूर रहमानने 3, शाकीब अल हसन, नासुम अहमद आणि मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी 2 तर मेहदी हसनने 1 गडी बाद केले. कीवींच्या संघाकडून हेनरी निकोल्सने सार्वाधिक 18 धावांची खेळी केली.

याआधीदेखील बांग्लादेशच्या संघाने हा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघालादेखील त्यांनी 62 धांवांवर ऑल आऊट केले आहे. तसेच बांग्लादेश संघाची ही खेळी बघून त्यांना कोणताही संघ हलक्यात घेऊ शकत नाही. तसेच बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलँडचा दुसरा T-20 चा सामना ढाका येथे उद्या (3rd September) खेळवण्यात येणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments