Bappa’s favorite prasad :बाप्पासाठी अजून बनवले नसतील, तर आजच बनवा हे दोन खास नैवेद्य…
हा नैवेद्य बाप्पाला तर आवडेलच घरातील मंडळीही अधिक रुचकर पणे खातील,जाणून घ्या यापदार्थांची रेसिपी

Bappa’s favorite prasad :आता गणेश चतुर्थी निमित्त घरोघरी मोदक बनत असतील पण गणपतीला फक्त मोदकांचाच नैवेद्य दाखवतात की अजुन ही काही असतं,चला तर मग जाणून घ्या बाप्पाला आपण आजून कोणता नैवेद्य बनवू शकतो.हा नैवेद्य बाप्पाला तर आवडेलच घरातील मंडळीही अधिक रुचकर पणे
खातील,जाणून घ्या यापदार्थांची रेसिपी.If you haven’t made it for Bappa yet, make these two special offerings today
बेरी खीर
जामुन घालून आपल्या देशी खीरच्या प्रेमाला मोहक स्पर्श द्या. ही खीर घाईघाईने बनवण्यासाठी फक्त थोडे दूध आणि साखर उकळून घ्या, जेव्हा दूध निम्म्याने कमी होईल तेव्हा थोडी ताजी मलई व वाळलेल्या बेरीज घाला. खीर फ्रिजमध्ये ठेवा आणि ताज्या जामुनांनी सजवा.
खजूर – पुरण पोळी
प्रथम खजूर तुपावर जरासा परतून घ्यावा, मग त्यात बदाम-काजू पावडर, खोबऱ्याचा किस बारीक वाटून घ्यावे. खजूरसुध्दा बारीक वाटून घ्या. तो वाटला जात नसेल तर त्यात डाळीचं पीठ खसखस आणि अर्धा कप दूध टाकून पेस्ट करुन घ्यावी. मग कढईत प्रथम खजूर पेस्ट व दूध उकळत ठेवावे. मग त्यात बाकी सर्व साहित्य टाकून सर्व दूध टाकावे. दूध आटून गोळा कढईतून सुटेल इतकं हलवत रहावं. गोळा गार करुन घ्यावा. मग आधीच मऊ मळलेल्या कणकेमध्ये खजूर सारण भरुन मस्त खमंग खजूर पुरण पोळ्या कराव्यात. त्या तांबूस रंगावर भाजाव्यात.
हे ही वाचा :