आपलं शहरबीएमसी

Mumbai in 2050 (BMC UPDATE) : 2050 मध्ये मुंबई जाणार पाण्याखाली, आयुक्तांनी आताच सांगितली ठिकाणांची नावं…

BMC UPDATE : मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी एक गंभीर भविष्यवाणी केली आहे..

BMC UPDATE : मुंबई महापालिकाचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी शहरासाठी एक गंभीर भविष्यवाणी केली आहे, की 2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा एक मोठा भाग, व्यापारी जिल्हा नरिमन पॉईंट आणि राज्य सचिवालय मंत्रालयासह, समुद्राच्या वाढत्या पातळीमुळे पाण्याखाली जाईल असे, ते म्हणाले.

महाराष्ट्राचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी मुंबई हवामान कृती आराखडा आणि त्याच्या वेबसाइटच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. तसेच चहल ही त्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांनी शहराच्या दक्षिण मुंबईतील अ, ब, क आणि ड वॉर्डांपैकी 70% वार्ड जलवायु हवामानामुळे पाण्याखाली जाऊ शकतात असा दावा केला आहे.

त्यांचे असे म्हणणे आहे की निसर्ग चेतावणी देत ​​आहे, परंतु जर लोक “जागे” झाले नाहीत, तर परिस्थिती “धोकादायक” ठरेल. ते म्हणाले, “कफ परेड, नरिमन पॉइंट आणि मंत्रालय पाण्यामध्ये बुडून जातील, म्हणजे ते नाहीसे होणार आहेत.” हा केवळ 25-30 वर्षांचा कालावधी आहे कारण 2050 जास्त लांब नाही असे बोलून इकबाल सिंह चहल यांनी सर्वांना सावध केले आहे.

“आपल्याला निसर्गाकडून इशारे मिळत आहेत आणि जर आपण जागे झालो नाहीत तर पुढील 25 वर्षात धोकादायक परिस्थिती निर्माण होईल आणि याचा परिणाम फक्त पुढच्या पिढीवरच नाही तर सध्याच्या पिढीवरही होऊ शकतो. मुंबई हे दक्षिण आशियातील पहिले शहर आहे जे आपल्या हवामान कृती आराखड्याची तयारी आणि काम करत आहे,अशी माहिती त्यांनी दिली.

अलीकडेच शहराला काही अत्यंत प्रतिकूल हवामान परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यावरच बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, हवामान कृती आराखडा अंतर्गत तसेच डेटा मूल्यमापनाने वाढत्या हवामानातील अनिश्चिततेमुळे मुंबई हे सर्वात असुरक्षित क्षेत्र म्हणून ओळखले आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments