आपलं शहरबीएमसी

BMC UPDATE : तिसऱ्या लाटेला सुरुवात, मुंबईतील 36 इमारती सील करण्याचं कारण काय

BMC UPDATE : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई हे सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होते

BMC UPDATE : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान मुंबई हे सर्वात जास्त प्रभावित शहरांपैकी एक होते, त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्यावर लोकांनी सुटकेचा नि: श्वास सोडला होता. परिणामी, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, कंटेन्मेंट झोनची संख्या आणि मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या जवळपास 98% कमी झाली होती. ही गोष्ट 2 आठवड्यांपूर्वी खरी ठरली असेल पण पुन्हा एकदा केसेस वाढू लागल्या आहेत.

अवघ्या एका आठवड्यात मुंबईत कंटामिनेटेड झोन आणि सील केलेल्या इमारतींच्या संख्येत 36% वाढ झाली आहे. सील करण्यासाठी विद्यमान प्रतिबंधात्मक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

बृहन्मुंबई नगरपालिकेचे प्रमुख इक्बाल सिंग यांनी सोमवार, दि.30 ऑगस्टला अधिकाऱ्यांना सील केलेल्या इमारतींमध्ये सक्तीचे नियम लागू करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.नवीन, एसओपिनुसार एका इमारतीत 5 पेक्षा जास्त रुग्ण असतील तर ती इमारत पूर्णपणे सीलबंद केले जाईल. या व्यतिरिक्त सीलबंद इमारतींमध्ये कोणालाही प्रवेश करण्याची परवानगी नाही, तसेच इमारतीच्या आत प्रवेशास मनाई आसेल . कमिशनरने पोलिसांना सर्व भवनामधील इमारतींच्या प्रवेशद्वारांवर सुरक्षा लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

बीएमसीने दिलेल्या प्रोटोकॉलनुसार, जर एका इमारतीमध्ये एक किंवा पाचपेक्षा कमी प्रकरणे नोंदवली गेली असतील तर,फक्त एकच मजला सीलबंद केला जाईल, तर पाचपेक्षा जास्त प्रकरणे आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल असे आदेश देण्यात आले आहेत.

22 ऑगस्टपर्यंत बीएमसीच्या आकडेवारीनुसार, मुंबईत 22 सीलबंद इमारती आणि 1089 सीलबंद मजले होते. आता त्यात अनेक पटीने वाढ झाली आहे.तीच आकडेवारी सांगते की 28 ऑगस्ट पर्यंत मुंबईत 30 इमारती तर 1107 सीलबंद मजले होते.

गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम उपनगरातील किमान 7 इमारती सील करण्यात आल्या आहेत, कांदिवलीतील काही आणि वांद्रे येथील पाली हिलमधील दोन इमारती सील करण्यात आल्या होत्या . प्रत्येक इमारतीमध्ये 5 पेक्षा जास्त प्रकरणांची नोंद आहे. या इमारतींच्या संदर्भात, BMC प्रमुखांचे मत आहे की या परिसरात राहणाऱ्या सर्व रहिवाशांची प्राधान्य तत्त्वावर चाचणी झाली पाहिजे आणि कंट्रॅक्ट ट्रेसिंगच्या प्रयत्नांना आगामी काळात आणखी बळकटी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments