खूप काहीटेक

Bullet train update : मुंबई ते हैदराबाद व्हाया बारामती, पहा कशी असेल हाय स्पीड बुलेट ट्रेन

तसेच 'नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड'ने (NHSRCL) मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्व्हे) सर्वेक्षण सुरू केले आहे.

Bullet train update :  मुंबईकरांचा बुलेट ट्रेनने प्रवास करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.कारण या प्रकल्पाची व्यवहार्यता सध्या रेल्वे मंत्रालयाकडून तपासली जात आहे.तसेच ‘नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’ने (NHSRCL) मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी लिडार (लाइट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्व्हे) सर्वेक्षण सुरू केले आहे.(From Mumbai to Hyderabad via Baramati, see what a high speed bullet train would look like)

हायस्पीड रेल्वे लाईन महाराष्ट्रातील 11 स्थानकांद्वारे मुंबई, पुणे व हैदराबादला जोडली जाणार आहे. मुंबई-पुणे-हैदराबाद’ बुलेट ट्रेनसाठी 649.76 किमीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम खूप जलद गतीने सुरू आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार, प्रस्तावित प्रकल्पामध्ये ठाणे, नवी मुंबई, लोणावळा, पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, गुलबर्गा, विक्रबाद आणि हैदराबादसह अशा एकूण 10 रेल्वे स्थानकांचा समावेश असणार आहे.

बुलेट ट्रेनसाठी रेल्वे मार्ग ठाणे, रायगड, पुणे व सोलापूर या चार जिल्ह्यांना व्यापणार आहे. या प्रकल्पासाठी ठाणे जिल्ह्यात एकूण 1200 हेक्टर जमिनीची आवश्यकता असेल व प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण ड्रोनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. प्रस्तावित रेल्वे कॉरिडॉर मुख्य एक्सप्रेसवे, राष्ट्रीय महामार्ग, ग्रीनफिल्ड क्षेत्रांमध्ये चालवण्याची योजना आखली आहे.तसेच कॉरिडॉरसह विविध शहरांमध्ये हाय-स्पीड रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी मध्यवर्ती सिटी रोड नेटवर्कच्या मुख्य रस्त्यांमधून जाण्याची शक्यता आहे.

मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प रेल्वे मंत्रालयाने हाती घेण्याचा प्रस्ताव दिला आहे. मुंबई आणि हैदराबाद दरम्यानचा प्रवास करण्यासाठी सुमारे 14 तास लागतात.जर बुलेट ट्रेन सुरू झाली,तर मुंबई ते हैदराबाद प्रवास फक्त 3 तासात पूर्ण होणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments