आपलं शहरलोकल

Central Railway : घाटकोपर स्थानकावर 12 मीटर लांबीचा FOB; परंतु कामाकडे अजूनही दुर्लक्ष…

अपग्रेडेशनचा एक भाग म्हणून एलिव्हेटेड डेक आणि स्कायवॉकसह स्टेशनवर 12 मीटर लांबीचे तीन फूटओव्हर-ब्रिज (FOB) बांधण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते.

Central Railway : मुंबईतील नागरिक कामानिमित्त जास्तीत-जास्त प्रवास हा रेल्वेने करत असतात. तसेच मुंबईचे घाटकोपर स्थानक हे मध्य रेल्वेवरील सर्वात गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते.अहवालानुसार लाखो प्रवासी दररोज या स्टेशनचा वापर करतात, विशेषत: पीक अवर्सच्या वेळी, या स्थानकावर प्रचंड गर्दी होते व प्रवाशांच्या हालचाली मंदावतात. यामुळे अनेक अडचणी निर्माण होत असतात.(12 meter long FOB at Ghatkopar station; But work is still neglected …)

हे मुद्दे लक्षात घेऊन, रेल्वेने स्थानकावर गर्दी नियंत्रित करण्यासाठी योजना आखली होती व त्यासाठीच्या डिझाइनवर विचार केला जात होता. अपग्रेडेशनचा एक भाग म्हणून एलिव्हेटेड डेक आणि स्कायवॉकसह स्टेशनवर 12 मीटर लांबीचे तीन फूटओव्हर-ब्रिज (FOB) बांधण्यात येणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले होते.

त्यासाठीची प्रक्रिया रेल्वे प्रशासनाने 2019 मध्ये सुरू केली होती. जिथे योजनांचा पहिला संच नोव्हेंबर 2019 मध्ये सादर करण्यात आला होता. फेब्रुवारी 2020 मध्ये मिड-डे मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की योजनेवर कोणतीही हालचाल किंवा निर्णय अजून घेण्यात आला नाही, ज्यामुळे प्रकल्पात लक्षणीय विलंब झाले आहे.

यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या योजनेचा टप्प्याटप्प्याने विचार केला जात आहे. मुंबई रेल्वे विकास निगम (MRVC) च्या अधिकाऱ्यांनी मेट्रोमुळे प्रवासी वाहतुकीत झालेल्या वाढीची दखल घेतली आहे.तसेच घाटकोपर स्टेशनवर फूटओव्हर-ब्रिज बांधण्याचा काम 15 ऑक्टोबर 2021 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments