विद्यापीठ

CET Exam2021 : CET परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, पहा संपूर्ण वेळापत्रक

कोरोनाचा सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना CET परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. 

CET Exam2021 :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीईटीची परीक्षा होणार आहे. त्यामुळे कोरोनाचा सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना CET परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

बारावीचा निकाल जाहीर होऊन बराच कालावधी झालेला आहे. त्यापुर्वीच अनेक विद्यार्थ्यांनी तंत्र शिक्षण विभागातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व परीक्षेसाठी (सीईटी) cet अर्ज केला. मात्र, सीईटीच्या तारखा जाहीर न झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तणावाचे वातावरण होते. परंतु आता लवकरच 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत ही CET परीक्षा होणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत ( uday Samant)यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 14 वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा 25 दिवसांत होणार आहेत. यापैकी सर्वाधिक विद्यार्थी 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या काळात बीई/बीटेक, बीफार्म,(bfarm, betack ,difarm ) डीफार्म, शेती आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांची ‘एमएचटी-सीईटी’ ही परीक्षा देतील.राज्यभरातील 8 लाख 55 हजार 978 विद्यार्थी परीक्षा देतील. यासाठी राज्यात 226 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तसंच राज्याबाहेरील केंद्राच्या संख्येतही यावर्षी वाढ करण्यात आलेली आहे. परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.

राज्यातील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या प्रवेशासाठीची साईटी परीक्षा येत्या 15 सप्टेंबरपासून आयोजित केली आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर राज्यातील सर्व महाविद्यालय सुरु करण्याचा मानस असल्याचे असे उदय सामंत यांनी मंगळवारी 7 सप्टेंबर रोजी जाहीर केले.त्यानुसार तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.सर्व परीक्षांचा निकाल 20 ऑक्टोबरपर्यंत लावण्यात येणार आहे.राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी कॉलेज ( opening colleges )  सुरु होतील असं नाही. त्या भागातील कोरोनाची स्थिती काय आहे यावर हा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम पाळूनच राज्यामध्ये कॉलेजेस सुरु केले जाणार आहेत.(covid restrictions follo)

 पहा CET परीक्षांचे वेळापत्रक आणि निकाल:

१) यात मास्टर इन कंम्प्युटर ॲप्लिकेशन, मास्टर ऑफ आर्किटेक्चर , मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंटसाठीची सीईटी परीक्षा 15 सप्टेंबरला होईल.

२) मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन 15, 16, 17 सप्टेंबर, बॅचर ऑफ आर्ट्स 15 सप्टेंबर, मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठीची सीईटी परीक्षा 16, 17, 18 सप्टेंबर 2021 रोजी होईल.

३) टेक्नोलॉजिच्या परीक्षा म्हणजे इंजिनियरिंग, फार्मसी, ॲग्रीकल्चरसाठीची सीईटी परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत होतील.

४) बॅचरल ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ एज्युकेशन, बॅचर ऑफ एज्युकेशन, बॅचर ऑफ लॉ ( पाच वर्षासाठी), बॅचर ऑफ फिजिकल एज्युकेशनसाठीची सीईटी परीक्षा 3 ऑक्टोबरला होईल.

५) बॅचर ऑफ लॉ ( 3 वर्षासाठी) 4 आणि 5 ऑक्टोबर, बॅचर ऑफ एज्युकेशन (जनरल) साठीची सीईटी परीक्षा 6 आणि 7 ऑक्टोबरला होईल. तसेच बॅचर ऑफ फाईन आर्टची परीक्षा 9 आणि 10 ऑक्टोबरला होईल.

या सर्व परीक्षा झाल्यानंतर 20 ऑक्टोबरपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल जाहीर होईल. अशा पद्धतीची यंत्रणा सीईटी विभागाने सुरु केली आहे.

;

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments