आपलं शहर

Corona in mumbai : कोरोना वाढतोय, हायकोर्टाचा पुढाकार, गर्दी करणाऱ्यांना दिला अल्टिमेटम

मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रामध्ये दिलासा देणारी बाब आहे की कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे.

Corona in mumbai मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढताना आणि कमी होताना दिसते.परंतु मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रामध्ये दिलासा देणारी बाब आहे की कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. तसेच मृतांची संख्याही कमी झाली आहे. परंतु चिंतेचीबाब म्हणजे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढलेली दिसते.Corona is growing, High Court initiative, ultimatum given to the crowd

मुंबई उच्च न्यायालयाने शहरातील बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाणी वाढती गर्दी पाहता चिंता व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी चेतावणी स्वरात म्हटले की जर गर्दी नियंत्रित केली नाही तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जी परिस्थिती निर्माण झाली होती. ती पुन्हा निर्माण होईल.त्यामुळे प्रशासन व जनतेने परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावे आणि खबरदारी घ्यावी.

मुंबईत दिवसभरात 30 हजार 421 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली. सध्या झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन शिल्लक नाही. परंतु 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत.

मुंबईत आतापर्यंत एकूण 7 लाख 22 हजार 621 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 15 हजार 977 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना रिकव्हरी रेट सध्या 97 टक्के आहे. कोरोना संसर्ग वाढीचा दर सध्या 0.05 टक्के आहे. मुंबईत कोरोना बाधितांची संख्या दुप्पट
होण्याचा कालावधी आता 1 हजार 511 दिवसांवर पोहोचला आहे.

ऑगस्टच्या शेवटच्या दिवशी 323 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. 30 ऑगस्ट रोजी ही संख्या 334 होती. त्याचबरोबर त्या दिवशी 272 लोक कोरोनामधून बरे होऊन दिवसभर घरी परतले. त्याचप्रमाणे, त्या दिवशी गेल्या चोवीस तासांत मुंबईत केवळ एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.तसेच 31 ऑगस्ट रोजी एका दिवसात 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाची प्रशासकीय बैठक सोमवारी पार पडली.त्या बैठकीत वकील आणि इतर तज्ञ उपस्थित होते. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ.राहुल पंडित यांनीही सहभाग घेतला होता. ते म्हणाले की एप्रिल 2022 पूर्वी देशात कोरोनाची सुटका होणार नाही. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांनी ही माहिती दिली.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments