आपलं शहरखूप काहीफेमस

CSMT Station : CSMT स्थानक का मानलं जातं ऐतिहासिक, वाचा न ऐकलेला किस्सा

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.येथे नेहमीच लोकांनी वर्दळ पाहायला मिळते.

CSMT Station : तुम्ही मुंबईतील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या असतील. तेथील आकर्षक स्थळ पाहिले असतील,मुंबईला जाण्यासाठी किंवा मुंबईत प्रवास करण्यासाठी तुम्ही जास्तीत-जास्त रेल्वेने प्रवास केला असेल,मुंबईतील व देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून CSMT ची ओळख आहे.तुम्ही मुंबईतील या प्रसिद्ध व आकर्षक स्थळाला भेट दिली आहे का?काहीजण कामानिमित्त नेहमी येथून प्रवास करत असतात,तर एकदा तुम्ही CSMT ला पर्यटक म्हणून भेट द्या आणि त्याचे सौंदर्य आणखी निरखून पहा.चला तर मग CSMT चे वैशिष्ट्य जाणून घेऊया.(Why CSMT station is considered a historical, unread case)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.येथे नेहमीच लोकांनी वर्दळ पाहायला मिळते.मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स.1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले होते.

1878 मध्ये या रेल्वे स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली होती. या लोकप्रिय आणि देखण्या रेल्वे स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी जवळपास 10 वर्ष लागली होती. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी एवढा कालावधी लागत नव्हता,जेवढा कालावधी या स्थानकाला बांधण्यासाठी लागला होता. या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन मे 1888 मध्ये करण्यात आले होते.

CSMT हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असून त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय ही आहे.CSMT चे पूर्वीचे नाव मार्च 1996 पर्यंत व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते.त्यानंतर मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले. जून 2017 मध्ये स्थानकाच्या नावात पुन्हा बदल करण्यात आला.छत्रपती शिवाजी टर्मिनस या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाऊ लागले.

महाराष्ट्राच्या 7 आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून 2013 मध्ये घोषणा करण्यात आली होती.या स्थानकांमध्ये 18 फलाट असून फलाट क्र. 1 ते 8 हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकांचे आहेत.व फलाट क्र. 9 ते 18 हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होत असतात.

या स्थानकाची रचना ब्रिटिश स्थापत्यकार फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स नावाच्या व्यक्तीने केली आहे.तसेच या स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची असून लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.CSMT स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र 1950 मध्ये भारत सरकारच्या आदेशानुसार इमारतींवरील सर्व ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यात आले.त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला होता.

मुंबईतील या प्रसिद्ध स्थळाला पर्यटक कधीही भेट देऊ शकता.येथे जाण्यासाठी कोणताच प्रवेश शुक्ल आकारला जात नाही.हे स्थळ मुंबईतील डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग (हॉर्नबी रोड),छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एरिया येथे आहे.

 

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments