फेमस

CSMVS in Mumbai : 20 व्या शतकातील मुंबईतील हे म्युझियम का आहे प्रसिद्ध, पहा का आहे खास…

मंगळवार ते रविवार सकाळी 10.15 ते सांयकाळी 5.45 वाजता हे वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते.

CSMVS in Mumbai : मुंबई हे महाराष्ट्राच्या राजधानीचे ठिकाण आहे. येथे देश-परदेशातले पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.पर्यटक येथील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी देतात. त्या स्थळांबरोबरच मुंबईचे पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम हे आताचे श्री छत्रपती शिवाजी महाराज-वस्तुसंग्रहालय आहे. गेट वे ऑफ इंडियाकडे जाताना लायन गेट, विधानभवन, मुंबई विद्यापीठ आणि चौथी वास्तू म्हणजे अत्यंत देखण्या उमेदीत उभे असलेले हे म्युझियम आहे.Why is this 20th century museum in Mumbai famous, see why it is special …

हे वस्तुसंग्रहालय 20 व्या शतकातील असून आजही या संग्रहालयाची वास्तू भक्कम आहे. या वास्तूच्या आतील व आजूबाजूच्या परिसराचा आराखडा ब्रिटीश वास्तू विशारद जॉर्ज विटेट यांनी तयार केला होता. या वास्तूच्या रचनेत इस्लामी, राजपूत व हिंदू मंदिरांच्या वास्तू तंत्राचा वापर केलेला आहे.

या संग्रहालयात अभ्यास करण्यासाठी व पाहण्यासाठी अनेक प्राचीन गोष्टीं व दुर्मिळ चित्रं, हस्तलिखीते जतन करून ठेवलेल्या आहेत. या संग्रहालयातील विविध दालने फिरण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन तास लागतात.

या वस्तुसंग्रहालयात प्रत्येक मंगळवारी मुले व विद्यार्थी यांना येथे मोफत प्रवेश मिळतो. मंगळवार ते रविवार सकाळी 10.15 ते सांयकाळी 5.45 वाजता हे वस्तुसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले असते. येथील पुरेपूर माहिती करुन घेणार्‍या पर्यटकांना व अभ्यासकांना किमान 4 ते 5 तास वेळ लागतो.वस्तूसंग्रहालय दर सोमवारी बंद असते. येथे इंटरनेट सेवा सुद्धा उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहायल, महात्मा गांधी रोड, फोर्ट, मुंबई येथे स्थित आहे.

वस्तुसंग्रहालयात जाण्यासाठी प्रवेश शुल्क :भारतीयांसाठी 60 रु.,परदेशातील पर्यटकांसाठी 300 रु. तर मुलांसाठी प्रवेश शुल्क 10 रु आहे.तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश शुल्क 25 रुपये ठेवण्यात आले आहे.कोरोनामुळे हे वस्तुसंग्रहालय 11 महिने बंद ठेवण्यात आले होते.अनलोक मध्ये हे संग्रहालय टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू करण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments