आपलं शहर

Curfew in mumbai : 24 सप्टेंबरपर्यंत मुंबईत कर्फ्यू लागू, जाणून घ्या संपूर्ण नियम

बृहन्मुंबईच्या हद्दीत 24 सप्टेंबर 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.

Curfew in mumbai : महाराष्ट्रातील बृहन्मुंबईच्या (BMC) हद्दीत शांतता व सुव्यवस्था ही कायम अबाधित राखण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 37 (1) (2) व कलम 2 (6) तसेच कलम 10 (2) नुसार बृहन्मुंबईच्या हद्दीत 24 सप्टेंबर 2021 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहे.Curfew imposed in Mumbai till September 24, know the full rules

या आदेशानुसार नागरिकांना शस्त्र, काठ्या, तलवारी, भाले, परवाना रहित बंदुका, सुऱ्या, लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ न बाळगण्याचे आदेश जारी केले.तसेच दगड किंवा शस्त्रे, सोडावयाची अस्त्रे, फेकावयाची हत्यारे, अग्नीशस्त्रे बरोबर घेणे, शस्त्रे जमा किंवा तयार करण्यावरही बंदी घातली आहे.तसेच कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करण्यावरही मनाई करण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, सभ्यता अगर नितीविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणे, हावभाव करणे, सोंग आणणे अशी चित्रे – चिन्हे, फलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांमध्ये प्रसार करणे अशा बाबी करण्यास ही मनाई करण्यात आली आहे.या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

शासकीय, निमशासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये सेवा बजावत असताना कर्तव्याच्या स्वरुपामुळे वरील शस्त्रे बाळगणे आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना हे जमावबंदीचे आदेश लागू असणार नाहीत. खाजगी सुरक्षा रक्षक, गुरखा, चौकीदार आदींना साडेतीन फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास मनाई असणार नाही, असेही एस. चैतन्य बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (अभियान) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments