बीएमसी

Dam project : 1000 कुटुंबांसह 4.5 लाख झाडे होणार उध्वस्त, वाचा BMC चा मास्टर प्लॅन काय?

तसेच या प्रकल्पामुळे BMC समोर सर्वात मोठी समस्या म्हणजे 4.5 लाख झाडे तोडण्याची आहे.

Dam project : मुंबईत पाणीपुरवठा ही खूप मोठी समस्या आहे. या समस्येवर तोडगा म्हणून BMC ने मुंबई शहरात 24 तास पाणीपुरवठ्यासाठी  पालघर जिल्ह्यात गारगाई प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली होती. BMC ने या प्रकल्पावर अभ्यास करून रोडमॅप तयार करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील केले आहेत, परंतु आता असे दिसते की BMC ने गरगाई प्रकल्पातून माघार घेतली आहे.4.5 lakh trees with 1000 families to be uprooted, read What is BMC’s master plan?

कारण गरगाई प्रकल्पाच्या मार्गात अनेक अडचणी आहेत.BMC च्या योजनेनुसार मुंबईला गारगाई प्रकल्पातून दररोज 450 MLD पाणी मिळणार होते.तसेच हा प्रकल्प 2024-25 पर्यंत पूर्ण करण्याचे BMC चे लक्ष्य ही होते. 3105 कोटींच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायची होती.परंतु या प्रकल्पामुळे सुमारे 1000 कुटुंबांना विस्थापित व्हावे लागणार होते, तसेच या प्रकल्पामुळे BMC समोर सर्वात मोठी समस्या म्हणजे 4.5 लाख झाडे तोडण्याची आहे.

BMC आयुक्त आयएस चहल यांनी सांगितले की,या सर्व अडचणींमुळे गारगाई प्रकल्प एकतर बराच काळ स्थगित ठेवला जाईल किंवा तो रद्द केला जाईल हे जवळपास निश्चित आहे. मनोरी प्रकल्पासाठी BMC चे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांनी सांगितले की, समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी वापरली जाणारी वीज मध्य वैतरणावर तयार केली जात आहे.या प्रकल्पातून सौर ऊर्जा उपलब्ध होईल. त्यामुळे मनोरी प्रकल्पावर BMC ला लागणारा विजेचा खर्चही वाचणार आहे, तर गारगाई प्रकल्पासाठी लाखो झाडे तोडावी लागणार आहेत.या तुलनेत मालाडच्या मनोरी येथील समुद्राचे पाणी गोड करण्याचा प्रकल्प हा पर्यावरणपूरक आहे.

मनोरी प्रकल्पावर 3520 कोटी रुपये खर्च होतील असा अंदाज BMC ने दर्शवला आहे. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही. त्यामुळे BMC ने गारगाई प्रकल्पाऐवजी मनोरी प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबईला दररोज 3850 MLD पाणी पुरवले जाते, जर समुद्रातून पाणी गोड करण्याची योजना सुरू झाली, तर ती मुंबईसाठी टर्निंग पॉईंट ठरेल, असा विश्वासही BMC ने व्यक्त केला आहे.

मुंबईची भविष्यातील पाण्याची गरज भागवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मनोरी येथे समुद्राचे पाणी गोड करण्याच्या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. BMC  आयुक्त आयएस चहल यांनीही या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. मनोरी प्रकल्पासाठी BMC ने MTDC कडून 12 हेक्टर जमीन घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पहिल्या टप्प्यात मुंबईला दररोज 200 MLD पाणी मिळणार आहे.त्यानंतर 400 MLD पाणीपुरवठा केला जाईल, असे BMC ने सांगितले.त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याची समस्या ही ‘मनोरी प्रकल्पामुळे’कमी होण्यास मदत होणार आहे.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments