आपलं शहर

Electric buses : मुंबईत ‘या’ दिवसापासून धावणार 1900 इलेक्ट्रिक बस, पाहा कसं असेल मॅनेजमेंट

या परिस्थितीत मुंबईतील बेस्ट ऑफ मुंबईने इलेक्ट्रिक बसेसच्या खेरेदीचे टेंडर काढला आहे. बेस्ट ऑफ मुंबईने 1900 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Electric buses : देशात तसेच मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम सर्वच वस्तूंवर होताना दिसत आहे. या परिस्थितीत मुंबईतील बेस्ट ऑफ मुंबईने इलेक्ट्रिक बसेसच्या खेरेदीचे टेंडर काढला आहे. बेस्ट ऑफ मुंबईने 1900 इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.(1900 electric buses will run in Mumbai from this day, see how the management will be)

त्यामुळे हे देशातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक बस ताफ्याचे संकेत आहेत. बेस्ट पुढील काही दिवसांतच 200 डबल डेकर बसेस खरेदी करण्यासाठीची निविदा काढणार असून, त्या बसेस पूर्णपणे इलेक्ट्रिक असणार आहेत.

बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, 2023 पर्यंत आम्हाला आमच्या ताफ्यातील सुमारे 50% बसेस इलेक्ट्रिक करायच्या आहेत. त्यासाठी त्यांनी 1,900 बसेससाठी निविदा काढल्या आहेत, ज्यात 12 मीटरच्या 1,400 बसेसचा समावेश आहे, तर 100 मिनी बसेस, 400 मिडी बसेसचा समावेश असणार आहे. त्यामुळे या इलेक्ट्रिक बसेस मुंबईकरांना लवकरच रस्त्यावर धावताना दिसतील.

राज्यात इलेक्ट्रिक बसेसची सेवा मोठ्या प्रमाणात सुरू व्हावी, म्हणून महाराष्ट्र सरकार मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक मोबिलिटीचा पाठपुरावा करणार आहे, यासोबतच राज्य सरकार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) 15 टक्के बसेसना इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचे धोरण आखले आहे.

मुंबईत होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसचं वृद्धीकरणामुळे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी पालिकेचे कौतुक केले आहे. बेस्टने 1900 इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा जारी केल्याचे आनंद झाल्याचंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

सध्या मुंबईत फक्त 386 इलेक्ट्रिक बस आहेत. त्यामुळे या इलेक्ट्रिक बसेसची ही भर पडल्याने हे भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या धोरणांच्या मदतीने महाराष्ट्रातील इतर शहरांना त्यांचा बस ताफा वाढवण्यासही मदत होणार आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments