फेमस

Famous Museum in Mumbai : मुंबईत पाहा जग्गजेत्यांचे मेणाचे पुतळे, अजून काय पाहायला मिळणार खास…

या म्युझियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत.

Famous Museum in Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक असलेले ठिकाण म्हणजे घाटकोपर येथील आरसिटी मॉलमध्ये असलेले, रेड कार्पेट वॅक्स म्युझियम. या म्युझियममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित व्यक्तींचे मेणाचे पुतळे उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी तुम्हाला राजकारणी, कलाकार, खेळाडू अशा मान्यवर व्यक्तींचे मेणाचे पुतळे पाहायला मिळतील.Look at the wax statues of world champions in Mumbai, what else is special to see …

20210911 145054

या म्युझियममध्ये महात्मा गांधी, बाळासाहेब ठाकरे, रामदास आठवले, अण्णा हजारे यांचेही मेणाचे पुतळे ठेवले आहेत. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अब्राहिम लिंकन, दलाई लामा, नेल्सन मंडेला, आइन्सटाईन या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्वांचे पुतळेही या म्युझियममध्ये ठेवण्यात आले आहेत.

इथे गेल्यानंतर या मेणाच्या पुतळ्यांसोबत तुम्हाला फोटो काढण्याची संधीही मिळणार आहे. तसेच तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्वतःच्या हाताचा हॅंड वॅक्सदेखील बनवून घेऊ शकता.

20210911 144811

याशिवाय हॅरी पॉटर, मायकल जॅक्सन, गंगनम स्टाईल स्टारर साय (PSY) अँजलीना जोली, ब्रँड पीट, ब्रुस ली, जेम्स बाँड हे कलाकार देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. जर तुम्ही फुटबॉल व मेसीचे फॅन असाल तर त्याच्या पुतळ्यासोबत फोटो काढण्याची संधीही तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे.

फक्त एवढंच नाही तर जॉन सीना, सायना नेहवाल या खेळाडूंचे मेणाचे पुतळे देखील आहेत. प्रथमदर्शी यांना पाहून वाटणारच नाही की इथले पुतळे हे मेणाचे बनवलेले आहेत.

images 22

फक्त बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही इथे नक्कीच मिस कराल; पण या व्यतिरिक्त आणखी अनेक आश्चर्यकारक गोष्टी तुम्हाला इथे पहायला मिळतील. रेड कार्पेट वॅक्स म्युझियम पर्यटकांसाठी आठवडाभर खुले असते. हे म्युझियम सकाळी 11:00 ते रात्री 9:30 पर्यंत चालू असते. हे वॅक्स म्युझियम खाजगी असल्याने काही ठराविक रक्कम यासाठी आकारली जाते.

रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हा मुंबईच्या आरसिटी मॉल, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम येथे आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments