Famous Zoo and Park : भेट द्या मुंबईतील प्रसिद्ध प्राणिसंग्रहालय व उद्यानाला;पहा काय आहे आकर्षण
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय याला क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने ही ओळखले जाते.

Famous Zoo and Park : मुंबईत प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांपैकी आणखी एक आकर्षक असलेले ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय हे लहान मुलांना तर आकर्षक करतेच व मोठी मंडळीही आवर्जून येथे भेट देतात. (Visit the famous zoo and park in Mumbai; see what is the attraction)
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय याला क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स या नावाने ही ओळखले जाते. ही बाग भायखळा परिसरात 53 एकर जागेत पसरलेली आहे.वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय व उद्यान हे मुंबईतील सर्वात मोठे व जुने संग्रहालय आहे.
येथे आपल्याला अनेक प्रकारचे वनस्पती व प्राणी पाहायला मिळतील. या प्राणी संग्रहालयात हत्ती, सिंह, वाघ, माकडे, मगरी इत्यादी अनेक वन्य प्राणी आहेत. तसेच अल्बिनो कावळे व फ्लेमिंगो सारख्या अनेक पक्षांचा वावर येथे दिसेल.तसेच येथील उद्यानात म्हणजेच राणीच्या बागेत विविध प्रकारची झाडे दिसतील.येथील बहुतांश झाडे ही 100 वर्षे जुनी आहेत.या बागेत 283 प्रजातींचे 3,213 वृक्ष आहेत.
याशिवाय सस्तन प्राणी, पक्षी व अनेक प्रकारच्या किटकांचे वास्तव्य या उद्यानात आहे.मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी अभ्यासासाठी या उद्यानाला नेहमी भेट देतात.अनेक वनस्पतीसंग्रहालयांपैकी मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे 465 नमुने जतन केलेले आहेत.
हे संग्रहालय सकाळी 9:30 वाजता उघडते व सायंकाळी 5:30 ला बंद केले जाते.तसेच हे संग्रहालय बुधवारी बंद ठेवले जाते.हे संग्रहालय भायखळा पूर्व, माझगाव, मुंबई येथे आहे.वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानात जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते.
हे ही वाचा :