फेमस

Financial Capital : मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा कसा मिळाला? वाचा भन्नाट किस्सा

महाराष्ट्रातील इतर शहरांच्या इतिहासापेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा आहे.

Financial Capital : आपल्या सर्वांना माहीती आहे, की भारताची आर्थिक राजधानी ही मुंबई आहे. परंतु मुंबईला आर्थिक राजधानीचा दर्जा कसा मिळाला हे माहीती आहे का? चला तर पाहुया मुंबई ते भारताची आर्थिक राजधानीपर्यंतचा संपूर्ण इतिहास पाहूया. (How about the Mumbai financial capital case)

महाराष्ट्रातील इतर शहरांच्या इतिहासापेक्षा मुंबई शहराचा इतिहास वेगळा आहे. इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगालची राजकन्या कॅथरिन यांच्या लग्नानिमित्त पोर्तुगीजांनी इंग्रजांना मुंबई हे बेट 1661 मध्ये भेट दिले होते. ईस्ट इंडिया कंपनीकडे जेव्हा या बेटाचा ताबा आला, तेव्हा या बेटाची अवस्था अत्यंत वाईट होती. सात वेगवेगळ्या बेटांचा समूह असलेल्या मुंबईत त्या काळात खाड्या आणि जमिनीवर खारे पाणी साठून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत होती.

त्यामुळे दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडत असत. इंग्रजांनी अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुंबईच्या विकासाला सुरुवात केली, या विकासाचा प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतून झाला. प्रथम इंग्रजांनी सात बेटांचा समूह असलेल्या मुंबईला एकत्रित करून नवे स्वरूप दिले. हळूहळू टप्प्याटप्प्याने मुंबई विकसित होत गेली. 19 व्या शतकाच्या अखेरीस मुंबई हे सुंदर वास्तुशैलीने नटलेल्या इमारतींचे समृद्ध शहर बनले. उद्योग आणि व्यापारात अग्रेसर असलेल्या या शहराने भारतातील प्रथम श्रेणीचे शहर होण्याचा मानही पटकावला.

तिन्ही बाजूंनी वेढलेला समूद्र, हे आर्थिक राजधानी बणण्याचं प्रमुख कारण ठरलं. सुरुवातीला रेल्वे तेवढी विकसित नव्हती, हवाई जहाजांनाही तेवढं महत्त्व नव्हत. विकासाच्या दृष्टीने इंग्रजांसाठी मुंबईचा समुद्रच वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरला होता. त्यामुळे भारतातला कच्चा माल बाहेर नेणे आणि बाहेरचा पक्का माल भारतात आणण्यासाठी मुंबई शहराने महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली. मुंबईत गोदामे उभी राहू लागली. परदेशी मालाप्रमाणे दोन नंबरच्या गोष्टींनीही हवं तेवढं स्थान त्याकाळी निर्माण केलं होतं. याचाच परिणाम की मुंबईत पैसा खेळता राहू लागला. अखेर मुंबईला सोन्याची नगरी म्हणून घोषित करण्यात आलं. तेव्हापासून संपूर्ण देशाचे आर्थिक केंद्र म्हणून मुंबईला घोषित करण्यात आले.

मुंबईतील आर्थिक व्यवहार जसे जसे उदयाला येऊ लागले, तस तसं इथे एका गोष्टीने जन्म घेतला, ती म्हणजे बीएसई लिमिटेड. ज्याला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) म्हणूनही ओळखले जाते, मुंबईसह जगाचं लक्ष असणाऱ्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात 1875 मध्ये झाली. दक्षिण आशियातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आणि जगातील दहावे सर्वात जुने स्टॉक एक्सेंज म्हणून याची ओळख आहे. बीएसईमध्ये मे 2021 अखेरपर्यंत 2,18,730 अब्जपेक्षा अधिकचे बाजार भांडवल असलेल्याची माहिती आहे, त्यामुळे मुंबईत पैसा खेळून राहण्याचं आणि आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला मिरवण्याचं एक मोठं कारण BSE आहे.

मुंबईत अनेक मोठे उद्योग स्थापन झाले, याचं काही श्रेय इंग्रजांना दिलं तरी काही वावगं ठरणार नाही. सर्व आर्थिक व्यवहारही जवळपास मुंबईतून होऊ लागले, जगात प्रसिद्ध असलेल्या मोठमोठ्या कंपन्या मुंबईत स्थापन होऊ लागल्या. मनोरंजनाचे केंद्र म्हणजेच जगातील सर्वांत मोठी मनोरंजनाची इंडस्ट्रीही मुंबईतच स्थापन झाली. जगात सर्वाधिक चित्रपट बॉलीवूडमध्ये तयार होतात. त्याचबरोबर मराठी चित्रपटांचेही मुंबई हेच प्रमुख केंद्र बनू लागले.

देशातील 25 टक्के व्यापार, बंदराच्या माध्यमातून होणारा 40 टक्के व्यापार आणि 70 टक्के भांडवली व्यवहार मुंबईत होत असून हे व्यवहार भारताच्या गंगाजळीत भर घालत असतात. जगातील दहा व्यावसायिक केंद्रांमध्ये मुंबईचा समावेश होतो, यावरून मुंबईचे जागतिक पातळीवरील महत्त्व लक्षात येते. म्हणूनच मुंबई शहराला देशाच्या आर्थिक राजधानीचा दर्जा मिळाला आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments