खूप काहीटेक

Fire brigade : आता फायर बाईक्स विझवणार आग, पाण्यापेक्षाही भयानक तंत्रज्ञान

या फायर बाईकमध्ये पाण्याबरोबरच 'वॉटर मिस' नावाचे नवीन तंत्रज्ञान बसवले आहे.या तंत्रज्ञानामुळे आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्यापेक्षा दहापट अधिक प्रभावी ठरणार आहे.

Fire brigade : आगीवर लवकरात लवकर नियंत्रण आणण्यासाठी नवी मुंबईत अग्निशमन दलाच्या विभागाने फायर बाईक अग्निशमन दलात आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या फायर बाईकमध्ये पाण्याबरोबरच ‘वॉटर मिस’ नावाचे नवीन तंत्रज्ञान बसवले आहे.या तंत्रज्ञानामुळे आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्यापेक्षा दहापट अधिक प्रभावी ठरणार आहे.(Now fire bikes will extinguish fire, technology more terrible than water)

नवी मुंबईत सध्या अग्निशमन दलाच्या 5 फायर बाईक अग्निशमन विभागात दाखल झाल्या आहेत.या बाईक्स वाशी, कोपरखैरणे, ऐरोली, नेरुळ व सीबीडी अग्निशमन केंद्रांवर प्रत्येकी एकएक अग्निशमन दलात दाखल झाल्या असून,गरजेनुसार त्यात वाढही केली जाणार आहे.तसेच या बाईक्स ‘रॉयल ​​एनफील्ड हिमालयन 350’ कंपनीच्या आहेत.

यातील 5 बाईक फायर बाईक म्हणून नोंदणीकृत आहेत.  याची इंजिन क्षमता 411 सीसी व 5 गिअर्स आहेत.  पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक i-CAD द्वारे मंजूर केलेल्या अत्याधुनिक BS-VI आहेत.  मुबलक पाणी व पेट्रोलसह, या फायर बाईक नागरिकांना अग्निशमन विरहित सुविधा देऊ शकतात.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले की या बाईक्समुळे दुर्गम भागात आग विझवणे सोपे होईल.  त्याचबरोबर रस्ते अपघात व वाहनांना अचानक लागलेल्या आगीमुळे रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होत असतो.यामुळे अग्निशमन दलाच्या मोठ्या वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यास विलंब होतो.अशा स्थितीत या फायर बाईक्स अग्निशमन दल वाहतूक कोंडीच्या ठिकाणी पोहोचून आग आटोक्यात आणू शकणार आहेत.

फायर बाईकची वैशिष्ट्ये

या फायर बाईक्समध्ये 40 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बसवल्या आहेत.पाण्याच्या टाकीमध्ये फोम वापरून आग नियंत्रित केली जाऊ शकते.या बाईक्समुळे 20 मीटर पर्यंत आगीवर नियंत्रण ठेवता येणार आहे.तसेच विमानतळावरील आग ज्याप्रमाणे आटोक्यात आणली जाते.त्याचप्रमाणे या बाईक्समुळे चालत्या वाहनातील आगीवर ‘रोझेंबर’ पद्धतीने आग आटोक्यात आणता येणार आहे.व या फायर बाईकमध्ये दोन अग्निशामक असणार आहेत. तसेच या फायर बाईकमध्ये सायरन आणि अग्निशामक यंत्रे बसवण्यात आली आहेत जेणेकरून ते कोणत्याही अडचणी शिवाय सहजपणे घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणू शकतील.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments