आपलं शहर

Flyover : उद्घाटनाच्या एका महिन्यातच 713 कोटींचा फ्लाय ओव्हर ब्रिज डागडुजीसाठी बंद…

मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्री एक अधिसूचना जारी करत गुरुवारपासून 1 ऑक्टोबरपर्यंत पुलावर दुचाकी वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून,

Flyover : 1 सप्टेंबर रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) नव्याने बांधलेल्या घाटकोपर मानखुर्द लिंक रोडचे पुन्हा देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. पुलावर वारंवार होत असलेल्या आपघातांमुळे हे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, ज्यामुळे काही दिवस वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.713 crore flyover bridge closed for repairs within a month of inauguration

मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी रात्री एक अधिसूचना जारी करत गुरुवारपासून 1 ऑक्टोबरपर्यंत पुलावर दुचाकी वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून, उर्वरित वाहनांची वेग मर्यादा ही 30 ते 50 किमी प्रति तास असेल असेही अधिसूचनेत वाहतूक पोलिसांनी म्हटले आहे.

या पुलावर झालेल्या अपघातामुळे एका 34 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तसेच एका 27 वर्षीय व्यक्तीची दुचाकी पुलावर आदळल्याने त्याला गंभीर दुखापती झाल्याच्या एक दिवसानंतर ही कारवाई करण्यात आली.त्यामुळे उत्तर दिशेचा रस्ता रविवारपर्यंत बंद करण्यात आला आहे. मात्र, उत्तर बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर दुरुस्तीसाठी दक्षिण बाजू काही दिवस बंद राहणार आहे.

BMC ने सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त स्पीड अडथळे आणि रॅम्बलर्स बसवण्याचा आणि पृष्ठभाग खडबडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, या आठवड्याच्या सुरुवातीला दुचाकी घसरल्याच्या व जीवघेण्या दुचाकी अपघाताच्या अनेक तक्रारींनंतर ती कामे व्यापक दुरुस्तीसाठी अंशतः बंद करण्यात आली आहे.

BMC ने बांधलेला 2.9 किलोमीटरचा घाटकोपर – मानखुर्द उड्डाणपूल हलक्या वाहनांसाठी (3 मीटर पर्यंत) 1 ऑगस्ट रोजी, बंद केल्यानंतर तीन वर्षांनी खुला करण्यात आला. यामुळे घाटकोपर ते नवी मुंबई प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या प्रवासाच्या वेळची बचत होण्यास मदत झाली आहे.

अहवालांनुसार, एक महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी 713 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या मुंबई उड्डाणपुलाचे उद्घाटन केले होते. उद्घाटनाच्या दिवशी ठाकरे यांनी BMC अधिकाऱ्यांना उड्डाणपुलाचे पृष्ठभाग सुरळीत करण्यास ही सांगितले होते.नंतर 4 ऑगस्ट रोजी भाजप नगरसेवकाने महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्र लिहून ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामकडे लक्ष वेधले होते.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments