बीएमसी

Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सवाला सुरुवात, पाहा मुंबईत कोणत्या गोष्टींवर निर्बंध?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे मुंबईत अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारसह मुंबई पालिकेने घेतला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे मुंबईत अनेक गोष्टींवर निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारसह मुंबई पालिकेने घेतला आहे. महानगरपालिकेने (BMC) गणेश चतुर्थी उत्सवांच्या वेळी गणपतीच्या मंडळांमध्ये भक्तांसाठी प्रत्यक्ष दर्शनावर बंदी घातली आहे. (Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav begins, see what are the restrictions in Mumbai)

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021

मुंबईकरांनी ‘माझे घर, माझा बाप्पा’ आदर्श पाळावा आणि यावर्षी आपआपल्या घरीच गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना केले आहे.

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021

यावर्षीही घरगुती गणेशमूर्तींची उंची दोन फूट तर सार्वजनिक मंडळांतील गणपतींची उंची चार फूट असावी, असा आदेश राज्य सरकराने दिला आहे. मुंबईत गणपती उत्सवाच्या वेळी मिरवणुकांमध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या लोकांच्या संख्येवरही नागरी संस्थेने निर्बंध लादले आहेत.

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021

सार्वजनिक मूर्ती मंडपामध्ये आणताना आणि विसर्जन करताना सार्वजनिक गणपती मंडळांच्या मिरवणुकीत 10 पेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचंही पोलीस प्रशासनाने घोषित केलं आहेत. भक्तांसाठी केबल नेटवर्क, वेबसाइट, फेसबुक किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे दर्शनाची सुविधा करावी, असे आदेश गणेशोत्सव मंडळांना देण्यात आले आहेत.

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021

जर एखादे मंडळ कंटेन्मेट झोनमध्ये येत असेल, तर गणपतीची प्रतिष्ठापना झोनच्या आवारातच करावी आणि विसर्जनाची व्यवस्थाही त्याच आवारात करावी, असा नियम लागू करण्यात आला आहे. सीलबंद इमारतींनाही हाच नियम लागू करण्यात आला आहे. अशावेळी भाविकांनी मंडळामध्ये न जाता स्वत:च्या घरी गणपती मूर्तींची स्थापना आणि विसर्जनाची व्यवस्था करावी लागेल.

Ganesh Chaturthi 2021
Ganesh Chaturthi 2021

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments