Uncategorized

Ganesh Chaturthi 2021 | बाप्पाच्या आगमनासाठी उभारलं भव्य डेकोरेशन, पाहा संपूर्ण गिरणगाव…

Ganesh Chaturthi 2021 | गणेशोत्सव म्हटलं की मुंबईमध्ये एक मोठा उत्साह असतो. मोठ-मोठ्या मूर्त्या, मोठी मंडळे, नागरिकांचा जल्लोष आणि जोराच्या घोषणा. हा उत्साह आणि जल्लोष कोरोना काळातही कमी नाही. राज्य सरकारने गणपतींच्या मूर्तींच्या उंचीवर जरी निर्बंध आणले असले, तरी मात्र अनेकांनी यावर पर्याय काढला आहे.

parag sawant parlar decoration
parag sawant parlar decoration

मुंबईच्या परळ येथे राहणाऱ्या पराग सावंत यांनीदेखील असच काहीसं गणपती बाप्पाच्या आगमणाला स्पेशल बनवलं आहे. पराग यांनी यंदाच्या गणपतीसाठी देखावा उभारला आहे. जो सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे.

parag sawant parlar decoration
parag sawant parlar decoration

मुंबईच्या इतिहासात ज्या परिसराची नोंद आहे, अशा गिरणगावाची प्रतिकृती पराग यांनी देखाव्यामध्ये साकारली आहे. गिरणगावात असलेल्या इंडिया युनायटेड मिल्स नंबर वनची प्रतिकृती, त्या इमारतीच्या समोर असलेले कंपाऊंड, मिल्समध्ये सुरु असलेली लाईट्स, भारतमाता सिनेमा, मिल्सच्या बाजुलाच लागलेले भोंगे असं सगळं चित्र या देखाव्यातून मांडण्याचा पराग यांनी प्रयत्न केला आहे.

पाहा फोटो – 

 

View this post on Instagram

 

A post shared by parag sawant (@parag__sawant)

पराग सावंत यांनी गेल्या वर्षी मुंबईतल्या BDD चाळीचा देखावा मांडण्याचा प्रयत्न केला होता, त्याची चर्चा ताजी असतानाच पराग यांनी उभारलेल्या गिरणगावाच्या संदूर प्रतिकृतीमुळे त्यांचा गणपती बाप्पा अगदी उठून दिसतो, हे नक्की.

पाहा संपूर्ण व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by parag sawant (@parag__sawant)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments