Uncategorized

Ganeshotsav in Mumbai : मुंबईत गणेशोत्सव इतका लोकप्रिय कसा झाला? पाहा काय आहेत महत्त्वाचे मुद्दे

त्यांनीच राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आणि सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी उत्सवाची सुरुवात केली.

Ganeshotsav in Mumbai : गणेश चतुर्थीचा उगम छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरु झाल्याची इतिहासात माहिती आहे. त्यांनीच राष्ट्रीय भावना जागृत करण्यासाठी आणि सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी उत्सवाची सुरुवात केली. 1882 पासून, उत्सवाला एक नवीन श्वास मिळाला जेव्हा बाल गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्य संग्रामाचा संदेश पसरवण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ म्हणून या उत्सवामध्ये ताकद भरली आणि अशा प्रकारे सार्वजनिक संमेलनांवर बंदी घातलेल्या ब्रिटिशांचा प्रतिकार म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात झाली.How did Ganeshotsav become so popular in Mumbai? Here are the key points

स्वातंत्र चळवळीचा भागू म्हणून सुरु झालेल्या सणामध्ये सर्व लोकांनी भाग घेण्यास सुरुवात केली आणि सणाला महत्त्व येण्यास सुरुवात झालं. याच गणेश चतुर्थीला सर्वाधिक महत्त्व आहे ते म्हणजे मुंबईत.

लोकमान्य टिळकांनी सर्वात आधी मुंबईत हा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला. ब्रिटीशांविरुद्ध सर्वाधिक लढे ज्या परिसरीत लढले गेले, त्याच परिसरात गणेशोत्सव सातरा करण्याचा निर्णय टिळकांनी घेतला. मुंबईच्या गिरगावात गणपती पुजण्याचा निर्णय पक्का झाला. केशवी नाईक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं सर्वात जुनं आणि मुंबईतील पहिलं गणपती मंडळ अस्तित्वात आलं तेही 1893 मध्ये.

“एका दशकाच्या आत गिरगावातील गणपती संपूर्ण महाराष्ट्राभर पसरू लागला. आधी दादर, परळ नंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशाचे पूजन केले जाऊ लागले. सुरुवातीपासूनच गणपतीबद्दल असलेली आस्था आणि प्रेम यामुळे मुंबईमध्ये गणेशोत्सवाचं महत्त्व मोठ्याप्रमाणात टिकून राहिलं. मुंबईतल्या धार्मिक नागरिकांनी गणेशाला आपल्या मनात स्थान दिलं. तेव्हापासून चालत आलेली परंपरा आजही कायम आहे.

मुंबईतील सर्वात उंच गणपतींच्या मूर्ती, त्यांचे मंडप, गणपती आणण्यासाठी सुरु असलेला गजर आणि लोकांचा उत्साह या गोष्टींमुळे मुंबईतल्या गणपतींना चांगली लोकप्रियता मिळत आहे. अनेकदा मंडळांच्या वाढलेल्या शर्यती, हेदेखील लोकप्रियतेचं कारण असू शकतं. कारण शर्यतीमधूनच अनेकदा मोठ्या मंडळांची, मंडपांची, मूर्त्यांची सुरुवात होत असते, असे अनेक अभ्यासक म्हणतात.

आता पाहुयात की मुंबईतील लोकप्रिय गणेश मंडळे नेमकी कोणती आहेत?

फोर्ट परिसरात असलेला इच्छापुर्ती गणेश मंडळ आणि मिंट रोडवरील गणपती, दरवर्षी राजस्थानमधील कारागीरांनी उभारलेले भव्य राजवाडा आणि मंदिराचे सेट उभारण्यात ही मंडळी अग्रेसर असतात.

त्यानंतर येतो चिंचपोकळी रेल्वे स्टेशनच्या बाजूला वसणारा चिंचपोकळीचा चिंतामणी. या चिंतामणीची महतीही मुंबईकरांमध्ये खूप आहे, हे नक्की. तिथेच असलेल्या रंगारी बदक चाळ मंडळाच्या गणपतीची चर्चाही जितकी ऐकावी तितकी कमीच असते. कामत चौक, झोबा राम मंदिरासमोर, ठाकूरद्वार नाका असे अनेक गणेश मंडळांची नावे घेता येतील, ज्यांनी 50 हून अधिक वर्षे गणेशाची सेवा केली आहे.

जर तुम्हाला गणेश विसर्जनाची धूम पाहायची असेल तर तुम्ही सर्वात आधी जुन्या मुंबईचे हृदय असलेल्या गिरगावला नक्की भेट द्या. त्या भागातील काही महत्त्वाच्या मूर्ती तुमच्या डोळ्यांचं पार्ण फेडतील, हे नक्की.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments