फेमस

Ganpati procession : स्वातंत्र्यानंतरचा पहिला गणपती, पहा 1946 मध्ये बाप्पाची मिरवणूक कशी निघाली…

तर 1946 मध्येही बाप्पाची मिरवणूक काढताना मुंबईचे रस्ते तुडुंब भरायचे.

Ganpati procession : मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणूक यावर्षी कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साध्या पद्धतीने निघणार आहे. परंतु मुंबईत गेली अनेक वर्ष अगदी ढोलताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक निघायची.The first Ganpati after independence, see how Bappa’s procession started in 1946 …

त्या मिरवणुकीत आपणही सर्व लोक सामील होऊन खूप धमालमस्ती व मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचा सण आपण साजरा करत होतो.  तर मुंबईतील विसर्जन मिरवणूक गणपती भक्तांसाठी जिव्हाळ्याचा विषय असते व काळानुसार मुंबईतल्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे स्वरूप हे बदलत असते.

20210916 151112

1946 मध्ये गणपती बाप्पाची मिरवणूक कशी निघायची हे वाचकांना जाणून घेण्यास नक्की आवडेल,तर 1946 मध्येही बाप्पाची मिरवणूक काढताना मुंबईचे रस्ते तुडुंब भरायचे.सर्व गणेश भक्त बाप्पाच्या मिरवणुकीत सामील व्हायचे, अनेक लोक गणपतीची मिरवणूक पाहण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून बघत असत.

20210916 150913

त्याकाळीही विविध प्रकारचे चित्ररथ उभारले जात होते. ते रथ मोठ्या आकाराचे असायचे, तसेच विविध प्रकारच्या जीप गाड्या सजवल्या जात होत्या व बाप्पाची मूर्ती पालखीत विराजमान असायची त्या पालखीला सर्व बाजूंनी वेढा असायचा, घरगुती गणपती हे डोक्यावर नेले जायचे. मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलिस बंदोबस्तही ठेवला जायचा.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments