फेमस

Ganpati to see in Mumbai : मुंबईतील फेमस गणपती बाप्पाचे दर्शन कसे घ्याल, पाहा संपूर्ण माहिती

परंतु यावर उपाय म्हणून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली आहे.

Ganpati to see in Mumbai : यंदाही कोरोनाच्या सवटाखाली गणेशोत्सव देशभरात विशेषतः महाराष्ट्रात राज्य सरकारने लागू केलेल्या नियमांचे पालन करून मोठ्या उत्साहात साजरे केले जात आहेत. यावर्षी, गणेशचतुर्थी उत्सव 10 सप्टेंबरला सुरू होऊन 19 सप्टेंबरपर्यंत आहे. या 11 दिवसांच्या उत्सवात अनेक विधी, आपआपल्या परंपरेनुसार गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. तसेच मुंबईत अनेक प्रसिद्ध गणपती आहेत, ज्यांच्या दर्शनासाठी गणेश भाविक आतुरतेने वाट पाहत असतात.See the complete information on how to visit the famous Ganpati Bappa in Mumbai

मुंबईत अनेक प्रसिद्ध आणि पाहण्यासारखे गणपती आहेत. या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी भाविक अनेक गणेश मंडळांमध्ये जातात. परंतु कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता, सरकारने तयार केलेल्या नियमानुसार गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही आपण प्रत्यक्ष गणेश मंडळात जाऊन बाप्पाचे दर्शन घेऊ शकत नाही. परंतु यावर उपाय म्हणून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी बाप्पाच्या ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली आहे. त्यामुळे भाविकांना घरबसल्या आता बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. चला तर मग पाहूया मुंबईतील कोणत्या प्रसिद्ध बाप्पाचे दर्शन आपण ऑनलाईन पध्दतीने घेऊ शकतो.

लालबागचा राजा

20210911 100035

मुंबईतील पुतळाबाई चाळीतील ‘लालबागचा राजा’, हा सुप्रसिद्ध आणि सर्वाधिक भेट दिली जाणारा गणपती बाप्पा आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक लालबाग बाजारात गर्दी करतात. कोरोनामुळे यंदाही बाप्पाचे प्रत्यक्ष दर्शन भाविकांना घेता येणार नाही, म्हणून लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या अधिकृत फेसबुक, यूट्यूब आणि इन्स्टाग्राम पेजवर भाविकांना दर्शनाची सोय करून दिली आहे. जेणेकरून भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या नियमांमुळे भाविकांना यंदाही लालबागच्या राजाचं घरातूनच दर्शन घ्यावं लागणार आहे.

अंधेरीचा राजा

20210911 101812

अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई स्ट्रीटजवळील बाप्पा हे ‘किंग ऑफ अंधेरी’ म्हणून ओळखले जातात. अंधेरीचा राजा हे गणपती उत्सवाच्या दरम्यान मुंबई उपनगरातील प्रमुख आकर्षण आहे. इतर गणेश मंडळांप्रमाणे त्यांनीही यावर्षी 4 फूट उंचीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. भाविकांना दुरून मूर्तीची झलक पाहता यावी म्हणून ती हायड्रोलिक क्रेनवर ठेवण्यात आली आहे. त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज वर ऑनलाइन पध्दतीने बाप्पाच्या दर्शनाची सोय केली आहे.

चिंचपोकळी चिंतामणी

20210911 101904

परळची 101 वर्षांची परंपरा गेल्यावर्षी खंडित झाली परंतु चिंचपोकळीचा राजा हे गणेश मंडळही यावर्षी गणेश चतुर्थी साजरे करत आहे. हे शहरातील प्रमुख मंडळांपैकी एक असून चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून मोठ्याप्रमाणात भक्त येत असतात. कोरोनाच्या संकटामुळे गणेश मंडळ समितीने त्यांच्या फेसबुक पेजवर ऑनलाइन दर्शन उपलब्ध करून दिले आहे.

गणेश गल्लीतील मुंबईचा राजा

20210911 101947

गणेश गल्लीतील ‘मुंबईचा राजा’ हा भव्यदिव्य मूर्तीसाठी ओळखला जातो. ‘मुंबईच्या राजा’ची मूर्ती सुमारे 22 फुटांची असते. यंदा मंडळाने सरकारच्या नियमांचे पालन करून 4 फुटांची मूर्ती आणली आहे. मूर्तीचे विसर्जनही कृत्रिम तलावात करण्यात येणार आहे. भाविकांसाठी ‘लाइव्ह दर्शन’ची सोय गणेश मंडळाने उपलब्ध करून दिली आहे.

खेतवाडीचा राजा

20210911 101641

सोन्यासह हिऱ्यांच्या दागिन्यांनी सजलेला खेतवाडीचा गणराज किंवा खेतवाडीच्या राजाची गणेश मूर्ती ही सर्वात सुशोभित मूर्तींपैकी एक असते. यावर्षी मुंबईतील खेतवाडीच्या राजाचेही ऑनलाइन दर्शन गणेश मंडळाने उपलब्ध करू दिले आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments