GANPATI’S FAVOURITE FOOD : गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ…
GANPATI'S FAVOURITE FOOD : गणपती उत्सव हा आपल्या भारतामध्ये अतिशय आनंदाने आणि सुखात साजरा केला जातो.

GANPATI’S FAVOURITE FOOD : गणपती उत्सव हा आपल्या भारतामध्ये अतिशय आनंदाने आणि सुखात साजरा केला जातो. दीड दिवसाचा, पाच दिवसाचा आणि दहा दिवसांचा गणपती बसवला जातो आणि या दिवसांमध्ये सगळीकडे सुख आणि समृद्धीचे वातावरण निर्माण होते.
तर या दिवसांमध्ये गणपतीला वेगवेगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये साधारण वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश केलेला असतो. तर त्यामध्ये गणपतीला सगळ्यात आवडणारा पदार्थ किंवा गणपतीला आनंदाने दिला जाणारा नैवद्य म्हणजे मोदक आहे.
मोदक हे गणपतीचे खूप आवडीचे आहे त्यामुळे गणपतीला नेहमी 21 मोदकाचा नैवेद्य हा सर्वप्रथम दाखवला जातो. असं म्हणतात की 21 मोदकांचा नैवेद्य जर गणपतीला अर्पण केले तर, श्री गणेश आणि भगवान शिव एकाच वेळी तृप्त होऊ शकतात. यावरून श्रीगणेशांना गोड पदार्थांविषयी असलेलं प्रेम दिसून येते. तांदळाचे पीठ, नारळ, गूळ आणि वाफवून परिपूर्णतेसाठी बनवलेले मोदक तयार करतात आणि त्यांना प्रसाद म्हणून देतात.
मोदकांचे प्रकार :
1) उकडीचे ( वाफवलेले ) मोदक : हे मोदक तांदळाचे पीठ , मैदा किंवा गव्हाचे पिठ तसेच किसलेले नारळ आणि गूळ एकत्र करून बनवले जातात. साधरण गणेश चतुर्थीच्या दिवशी हे मोदक अत्यंत आनंदाने बनवले जातात.
2) तळलेले मोदक : हे मोदक संपूर्ण गव्हाच्या पिठापासून बनवले जातात आणि याला पथोली (patholi) म्हणून देखील ओळखले जातात. हे मोदक खायला खूप मजेदार आणि कुरकुरीत लागतात.
3) चणा डाळ मोदक : नावाप्रमाणेच हे मोदक चणा डाळ आणि गूळ एकत्र करून वाफेवर शिजवले जातात . तमिळमध्ये या मोदकाला कडलाई परुपू पूरनम कोझुकट्टाई (Kadalai Paruppu Pooranam Kozhukattai) म्हणून ओळखले जातात.
4) रवा मोदक : रवा मोदकामध्ये बाहेरील भाग हा रव्याने बनवलेला असतो तर आतील मिश्रण हे गूळ,ओला नारळ आणि खसखस या पदार्थांनी बनलेला असते. त्यामध्ये चवीसाठी चिरलेले काजू- बदाम ही टाकू शकतो.
5) ड्रायफ्रूटस मोदक : ड्रायफ्रूटस मोदक हे साधरण बदाम, काजू, बेदाणे, चीरोंजी बियाण्यांनी बनवलेले जाते. आणि अजून चवी साठी त्यात नारळ किंवा मावा घालून मोदक बनवले जाऊ शकतात.