फेमस

Haji Ali Mumbai : समुद्राच्या चारही बाजूंनी वेढलेला दर्गा नेमका कसा उभा राहिला?

हाजी अली दर्ग्यात 15 व्या शतकातील सूफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांचे नश्वर अवशेष आहेत.

Haji Ali Mumbai :मुंबईत प्रसिद्ध असलेल्या ठिकाणांमध्ये इस्लामिक देवस्थानांपैकी एक म्हणजे, हाजी अली दर्गा, हे इंडो-इस्लामिक शैलीचे एक आकर्षक उदाहरण आहे. हाजी अली दर्गा त्याचे मोहक स्थान, स्थापत्य सौंदर्य आणि धार्मिक महत्त्वसाठी प्रसिद्ध आहे. हाजी अली दर्ग्यात 15 व्या शतकातील सूफी संत पीर हाजी अली शाह बुखारी यांचे नश्वर अवशेष आहेत. दूरपर्यंत पसरलेल्या अरबी समुद्रात स्थित असलेली ही मशीद पाण्यावर तरंगणाऱ्या स्वप्नातल्या दुनियेसारखी दिसते.How exactly did the Dargah surrounded by the sea stand?

मुंबई जवळील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे , हाजी अली दर्गा, हा दर्गा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून 6 किमी अंतरावर आहे. हा दर्गा 85 फूट उंचीचा असून, 4,500 चौरस मीटर क्षेत्रामध्ये पसरलेला आहे, मुंबईतील ही भव्य दर्गा ‘मकराना’ संगमरवरी वापरून बांधली गेली आहे, ताजमहालच्या संरचनेत जशी संगमरवरी वापरली आहे,तशीच या दर्ग्याच्या संरचनेत दिसते.या मंदिरात मस्जिद आणि पीर हाजी अली शाह बुखारी यांची कबर असून ,त्याठिकाणी दोन स्मारके आहेत.

थडगे सर्व बाजूंनी चांदीच्या चौकटींनी झाकलेले आहे. संपूर्ण बांधकाम संगमरवरीच्या आठ खांबांनी वेढलेले दिसते. मुंबईतील या प्रसिद्ध दर्ग्याची रचना इंडो-इस्लामिक व मुघल वास्तुकलेच्या शैलीचे अस्तित्व आहे.मुंबईतील ही प्रसिद्ध दर्गा 15 व्या शतकातील सूफी संत – सय्यद पीर हाजी अली शाह बुखारी यांनी बांधली असून,मशिदीकडे जाणारा रस्ता समुद्राच्या मध्यभागी असल्याने, उंच भरतीच्या वेळी हा रस्ता पाण्यात बुडतो, ज्यामुळे रस्ता पुर्णतः दुर्गम होतो.

जर तुम्ही हाजी अली दर्ग्याला भेट देणार असाल तर,सकाळी 5:30 ते रात्री 10:00 च्या दरम्यान या दर्ग्याचे दार चालू असतात.त्यांनंतर ते बंद केले जातात.या सुंदर मशिदीला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च महिना आहे,कारण त्या महिन्यात समुद्राला भरती कमी येते. ज्यामुळे दर्ग्यात जाण्यासाठी सहज प्रवेश मिळतो. या मशिदीला सर्व दिवस पर्यटक भेट देतात,परंतु विशेषतः गुरुवार आणि शुक्रवारी या दर्ग्यात मोठ्याप्रमाणात गर्दी असते.

रमजान आणि ईद सारख्या इस्लामिक सणांच्या विधींचा आनंद घेण्यासाठी आपण या दर्ग्याला भेट देऊ शकता. याशिवाय, सय्यद पीरचा वार्षिक उर्स किंवा पुण्यतिथी हा येथील सर्वात मोठा प्रसंग आहे. मुंबईतील हा प्रसिद्ध दर्गा समुद्राच्या चारही बाजूंनी वेढलेला आहे. जगभरातील देवप्रेमी, जाती, पंथ व धर्म यांची पर्वा न करता दर्ग्याला भेट देऊन त्यांची प्रार्थना करतात व आदरणीय संत आशीर्वादाने त्यांच्या इच्छा पूर्ण करतात.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments