क्राईम

Pari Paswan : मुंबईत माझाही अश्लिल व्हिडीओ बनवला होता, मिस इंडिया युनिव्हर्सचा मोठा आरोप

राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणाशी बोलत असताना प्रयंकाने हा खुलासा केला आहे.

Pari Paswan : झारखंडच्या गुमला येथे राहणाऱ्या मिस इंडिया युनिव्हर्सने मुंबईतील एक अनुभन शेअर केला आहे. ​​प्रियंका पासवान जेव्हा मुंबईमध्ये कामाच्या शोधात आली होती, तेव्हा एका प्रोडक्शन कंपनीने तिच्यासोबत गलिच्छ काम केल्याचा खुलासा प्रियंकाने केला आहे. राज कुंद्राच्या पोर्नोग्राफी प्रकरणाशी बोलत असताना प्रयंकाने हा खुलासा केला आहे. (Miss India Universe allegations-against-Mumbai-Production-House)

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिस इंडिया युनिव्हर्स झालेली प्रयंका ही एक मॉडेल आहे आणि मॉडेलच्या संबंधितच काम शोधण्यासाठी ती मुंबईत आली होती, त्यादरम्यान तिच्यासोबत ही घटना घडल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.

priyanka paswan1

“मी काम शोधण्यासाठी मुंबईला गेली होती, जिथे मला एका कोल्ड्रिंक्समध्ये काहीतरी मिसळून देण्यात आलं होतं, त्यानंतर काही वेळासाठी माझी शुद्ध हरपली होती, आणि माझा अश्लील व्हिडिओ बनवण्यात आला, असा खुलासा प्रियंका पासवानने केला आहे. ज्याच्याशी काही संबंध नसताना मला पॉर्न इंडस्ट्रिमध्ये ढकललं जात आहे, असा आरोप प्रियंकाने केला आहे. तिने आपल्या सासरच्या लोकांवर हा आरोप केला आहे.

प्रियांकाने, तिचा पती नीरज कुमारच्या विरोधातही हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे तिच्या सासरेचे लोक तिची बदनामी करत असल्याचंही प्रियंकाने म्हटलं आहे. प्रियंकाने 2019 मध्येच मिस इंडिया युनिव्हर्सचे विजेतेपद मिळवले आहे.

pari 0

प्रियकांने आपलं ठाम मत सांगितलं आहे की तिचा जो पॉर्न व्हिडीओ शूट करण्यात आला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आहे, त्यात प्रियंकाचा काहीच संबंध नाही, मुंबईत असे व्हिडीओ बनवणारे आणि मुलींना फसणाऱ्या अनेक टोळ्या पसरल्या असल्याचं प्रियंकाचं म्हणणं आहे. करिअरसाठी मुंबईत आलेल्या तरुणींची फसवणूक करून त्यांना अश्लील कृत्यात फसवलं जातं, असा आरोप प्रियंका पासवानने केला आहे.

  हे ही वाचा :  

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments