
IPL 2021 :कोरोना काळातील निर्बंधांमुळे सर्वच बंद करण्यात आले होते.आयपीएल आयोजकांची मागणी होती की कोरोनामुळे 2020 सालातील आयपीएल व यंदाचे पहिल्या सत्रातील आयपीएल प्रेक्षकांविना खेळवण्यात आले. पण आता येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया उर्वरित आयपीएल सत्रात प्रेक्षकांना देखील मैदानात प्रवेश मिळणार आहे. . दुबई, शारजा, अबुधाबी या तीन ठिकाणी आयपीएलचे सामने रंगणार आहेत.
आयपीएल चाहत्यांना मिळाला मोठा दिलासा. आयपीएलच्या आयोजन समितीकडून बुधवारी प्रेक्षकांना IPl साठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रेक्षक संख्या अद्याप निश्चित केलेल्या नाही. परंतु क्रिकेट स्टेडियमध्येय क्षमतेच्या 50 टक्के क्रिकेटप्रेमींनाच परवानगी देण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमानुसारच मर्यादीत प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात येणार आहे.
आयपीएल 2021 मध्ये 29 लढती झाल्या असून अजून 31 लढती शिल्लक आहेत. चेन्नई सुपर किंग्ज दुसऱ्या, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू दुसऱ्या, तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स चौथ्या क्रमांकावर आहे. या. साखळी फेरीतील लढतीनंतर 10 ऑक्टोबरपासून प्ले ऑफच्या लढती सुरू होतील. 15 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच खेळवली जाईल. अंतिम लढत दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर 7.30 वाजता सुरू होईल.
या सामन्याचे लाइव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. तर लाईव्ह स्ट्रीमिंग हॉटस्टारवर केले जाईल. जाणून घेऊयात सर्व संघाचे वेळापत्रकतसेच PlatinumList.net या वेबसाइटवरही जर आहेत.
आयपीएलची अधिकृत वेबसाईट www.iplt20.com येथे क्रिकेटप्रेमींना तिकिटे विकत घेता येऊ शकणार आहेत.
View this post on Instagram