फेमस

Iskcon Temple Mumbai : मुंबईतील या मंदिराला द्या भेट, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं, हे समजेल…

मुंबईतील हे प्रसिद्ध देवस्थान 4 एकर जागेत पसरलेले आहे. मुंबईतील राधा रस बिहारी मंदिर यालाच मुंबईतील प्रसिद्ध इस्कॉन मंदिर म्हणून ओळखले जाते.

Iskcon Temple Mumbai : आपण मुंबईतील अनेक ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. ती सर्वच ठिकाणे आकर्षकही आहेत. प्रत्येक ठिकाणाचं एक वेगळं महत्त्व आहे, अनेकदा आपण अशी ठिकाणे शोधत असतो, जी धावपळीच्या जीवनातून विश्रांती आणि मोकळा श्वास घेऊ देतील. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की मुंबईसारख्या व्यस्त शहरात निवांत फिरण्यासाठी कोणते ठिकाण आहे? जर तुम्हाला तुमच्या बिजी लाईफमधून एक दिवस तरी शांततेत घालवाचा असेल तर, नक्की भेट द्या मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांमधून एक असलेलं ते म्हणजे इस्कॉन मंदिर.(Visit this temple in Mumbai, you will understand exactly what happiness is)

भाविक मोठ्या श्रद्धेने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. आपल्या जीवनातील निदान एक दिवस तरी शांततेत घालवा म्हणून या मंदिराला असंख्य लोक भेट देतात, पण असं काय खास आहे या मंदिरात, हेच आपण आज पाहणार आहोत.

मुंबईतील हे प्रसिद्ध देवस्थान 4 एकर जागेत पसरलेले आहे. मुंबईतील राधा रस बिहारी मंदिर यालाच मुंबईतील प्रसिद्ध इस्कॉन मंदिर म्हणून ओळखले जाते. या मंदिराचे पूर्ण नाव आहे, श्री राधा रस बिहारी अष्ट सखी मंदिर. हे देवस्थान जुहू चौपाटीजवळच आहे. या मंदिराच्या घुमटाचे बांधकाम हे संगमरवरी पासून केलेले आहे व ते घुमट 100 फूट उंचीचे आहे. जर तुम्ही मुंबई नगरीला भेट देत असाल, तर मुंबईच्या इस्कॉन मंदिराला नक्की भेट द्या. हे मंदिर 1978 मध्ये बांधण्यात आले असून, शहरातील सर्वात सुंदर मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात मुख्य मंदिर, एक सभागृह, सात मजली अतिथीगृह, रेस्टॉरंट आणि एक बेकरीसुद्धा आहे.

एकदा तुम्ही या शांत मंदिराच्या निवासस्थानी आलात की तुम्ही या मंदिराच्या परिसरात अगदी रमून जाल, राधाकृष्णाचे दर्शन घेऊन तुमचे मन शांत होईल, मंत्रांचे मधुर जप तुमच्या आत्म्याला वाईट आणि विनाशापासून दूर राहण्याची शक्ती देतील.

या मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि शैक्षणिक प्रबोधनासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच येथे प्रभुपाद क्वार्टर, वैदिक शिक्षणाचे केंद्र, ग्रंथालय, वैदिक संस्कार हॉल, गोविंदा रेस्टॉरंट, गोविंदाची बेकरी इत्यादी आपल्याला या मंदिरात पाहायला मिळेल.

या मंदिराला भेट देण्याची वेळ सकाळी 5 ते दुपारी 1 पर्यंतची आहे. त्यांनतर हे मंदिर बंद केले जाते. पुन्हा सायंकाळी 4.30 वाजता मंदिर उघडले जाते आणि रात्री 9 पर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुले केले जाते. हे मंदिर हरे कृष्णा जमीन, जुहू चर्च रोड, जुहू, मुंबई येथे आहे.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments