फेमस

King of the farm : खेतवाडी गणपतीबद्दल ही गोष्ट माहिती आहे का?

खेतवाडीच्या राजाची स्थापना 1959 मध्ये झाली आहे. खेतवाडीमधील 12 व्या गल्लीतील गणपती सर्वात प्रसिद्ध आहे.

King of the farm : मुंबईतील खेतवाडीमध्ये आपल्याला अनेक आकर्षक व भव्य तसेच प्रसिद्ध गणपती पाहायला मिळतील खेतवाडीतील बाप्पांची ओळख ही खेतवाडीच्या राजा म्हणून आहे. खेतवाडीच्या राजाची स्थापना 1959 मध्ये झाली आहे. खेतवाडीमधील 12 व्या गल्लीतील गणपती सर्वात प्रसिद्ध आहे.तसेच मागच्या वर्षी खेतवाडीच्या बाप्पाच्या मूर्तीची सोंड ही आकर्षक हिऱ्यांनी सजवण्यात आली होती. या बाप्पाच्या मूर्तीचा आकार आणि त्याचे निर्माते वर्षानुवर्षे सारखेच राहिले आहेत.Do you know this story about Khetwadi Ganapati?

विविध रूपातील किंवा अवतारातील भव्य मूर्ती कायमच खेतवाडीच्या आकर्षणाचा विषय ठरत असतात. यंदाही अशाच काही वेगळ्या आकारातल्या मूर्ती खेतवाडीत पाहायला मिळत आहेत. आकर्षक सजावट आणि सिंहासनास्थ अशी 20 फूट उंच मूर्ती म्हणजे बाराव्या गल्लीतला खेतवाडीचा गणराज असतो.

लोभस मूर्ती व आकर्षक सजावट यामुळे हा गणपती नेहमीच आकर्षणाचा विषय ठरत आहे. खेतवाडीचा मुंबईचा महाराजा 24 फुटांचा असतो. हा बाप्पा झाडाच्या रूपात साकारला जातो. तर खेतवाडी सातव्या गल्लीतल्या गणपतीची मूर्ती ही २० फूट उंच असते.

याशिवाय या खेतवाडीत एकवीस मुखी गणपतीदेखील पाहायला मिळेल. खेतवाडीतून बाहेर पडले की कामाठीपुराचा चिंतामणीदेखील पाहण्यासारखा गणपती आहे. या बाप्पाची मूर्ती 22 फुटांची असते. तसेच ती वाघावर विराजमान झालेली असते.

परंतु या वर्षी राज्य सरकारने दिलेल्या नियमावलीनुसार खेतवाडीच्या राजाची मूर्ती ही लहान आकाराची आहे.सोन्यासह हिऱ्यांच्या दागिन्यांनी सजलेला खेतवाडीचा गणराज किंवा खेतवाडीच्या राजाची गणेश मूर्ती ही सर्वात सुशोभित मूर्तींपैकी एक असते. यावर्षी मुंबईतील खेतवाडीच्या राजाचेही ऑनलाइन दर्शन गणेश मंडळाने उपलब्ध करू दिले आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments