फेमस

lady slapped Shah Rukh Khan | मुंबईत येताच महिलेकडून खाल्ली थप्पड, शाहरुखचं असं जंगी स्वागत का झालं होतं…

lady slapped Shah Rukh Khan | आज किंग खान म्हणजेच शाहरुखचे करोडो चाहते आहेत, शाहरुखच्या प्रत्येक मूव्ह्सवर अनेक तरुणी फिदा आहेत. मात्र त्याच चाहत्यांना शाहरुखच्या अनेक गोष्टींबद्दल तितकी माहिती नसते, असे अनेक किस्से असतात, जे किस्से शाहरुख आपल्या अनेक मुलाखतीतून मांडण्याचा प्रयत्न करत असतो, अशाच एका मुलाखतीत त्याने एका महिलेचा थप्पड खाल्याचा किस्सा सांगितला होता. (lady slapped Shah Rukh Khan in train)

E6F9LHaVoAQLCw4?format=jpg&name=small

सुपरस्टार शाहरुख खानने आपल्या कारकीर्दीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘करण अर्जुन’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी गम’ सारखे तगडे चित्रपट बॉलिवूडला दिले. त्याच्या काम करण्याच्या स्टाईलमुळे, एक्सप्रेशन्समुळे त्याचे करोडो चाहते आहेत.

बॉलिवूडचा बादशहा म्हणूनआज शाहरुखकडे पाहिलं जातं, पण एक काळ असा होता की त्याला कोणी ओळखत नव्हते. किंग खान जेव्हा पहिल्यांदा मुंबईत येत होता तेव्हाच्या चर्चा आता होऊ लागल्या आहेत. तो जेव्हा आपल्या पहिल्या आयुष्याबद्दल अनेक किस्से सांगत असतो, तेव्हा ऐकणाऱ्यांना त्यातील काही गोष्टी खऱ्या वाटत नाहीत, असाच एक किस्सा त्याच्यासोबत ट्रेनमध्ये घडला होता.

E4tOZSMWQAACTrH?format=jpg&name=large

शाहरुख खान जेव्हा पहिल्यांदा मुंबईमध्ये आला, तेव्हा त्याला मुंबईतील लोकल ट्रेनबद्दल आणि एक्सप्रेसबद्दल तितकं माहिती नव्हतं. मुंबईत येणाऱ्या अनेक ट्रेन अशा आहेत, ज्या मुंबईत प्रवेश केल्यनंतर लोकलप्रमाणे अनेक स्थानकांवर थांबत असतात. अशीच एक ट्रेन दिल्लीहून मुंबईला आली होती, ज्यातून रिझर्वेशनच्या कोट्यातून शाहरुख खान प्रवास करून येत होता.

El1 wv3VMAE7f8d?format=jpg&name=medium

शाहरुखसोबत त्याचे काही मित्रही त्याच्याबरोबर प्रवास करत होते, ज्यावेळेस शाहरुख खानच्या जागेवर कोणी बसण्याचा प्रयत्न करत असे किंवा त्याला बाजुला सरकायला सांगत असते, तेव्हा तो कोणालाही जागा देत नव्हता, त्याला वाटायचे की आपण जी जागा बूक केली आहे, ती शेवटपर्यंत आपलीच असणार आहे. त्यामुळे तो अनेकांना त्या जागेवर बसण्यास विरोध करत असे, त्याच्यासोबत अनेक मित्र होते, त्यामुळे त्याच्याबरोबर कोणी वाद घालत नव्हते, मात्र त्याचवेळी एक महिला त्या ट्रेनमध्ये चढली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

ती महिला तिच्या पतीसोबत शाहरुख खानच्या जागेजवळ आली. ती महिला असल्याने शाहरुखने तिला बसण्यास आपली जागा दिली मात्र तिच्या पतीला ती जागा दिली नाही, यावर महिलेला इतका राग आला की तिने शाहरुख खानला जोरदार थप्पड मारली आणि म्हणाली की ही प्रत्येकाची ट्रेन आहे, तू कोणाला अडवू शकत नाहीस, यावेळी शाहरुख खानला काहीच समजलं नाही, की त्याच्यासोबत नेमकं काय होत आहे.

त्यानंतर शाहरुख खान एका सीटच्या कोपऱ्यात शांतपणे बसून विचार करत होता की, मुंबईत येताच त्याचे एवढे जंगी स्वागत का झाले.

EblFDujU4AEkZIb?format=jpg&name=large

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments