लोकल

Local train : मध्य व पश्चिम रेल्वे लवकरच सुरू करणार ही सुविधा; पहा काय आहे मॅनेजमेंट

ज्यामध्ये 70 टक्के प्रवाशांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन्हीमध्ये अतिरिक्त एसी ट्रेनची गरज असल्याची मागणी केली जात आहे.

Local train : कोरोनाच्या संकटामुळे गेले अनेक महिने मुंबईतील लोकल सुविधा बंद होती. ती आता टप्याटप्याने पुन्हा सुरू करण्यात आली आहे.परंतु लोकल मधील अनेक सुविधा या अजूनही बंद आहे.पण आता रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेन प्रवासाच्या मागण्या, प्रश्न आणि इतर पैलू समजून घेण्यासाठी अलीकडेच प्रवाशांसोबत एक सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये 70 टक्के प्रवाशांनी मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे या दोन्हीमध्ये अतिरिक्त एसी ट्रेनची गरज असल्याची मागणी केली जात आहे.(Central and Western Railways will soon launch this facility; See what is management)

या सर्वेक्षणानंतर, अधिकाऱ्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यात नमूद केले की अधिकाऱ्यांनी या मागण्यांकडे लक्ष दिले आहे.व म्हणूनच एसी, सेमी-एसी आणि नॉन-एसी कोचसह हायब्रिड लोकल ट्रेनचे डबे लवकरच पश्चिम व मध्य रेल्वेत उपलब्ध करून दिले जातील.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसाळ म्हणाले की, संबंधित विभाग अतिरिक्त एसी लोकल गाड्या सुरू करण्याच्या दिशेने काम करत असून या हायब्रिड मॉडेलमध्ये लवकरच उपलब्ध केल्या जातील, जेणेकरून गाड्यांमध्ये एसी व नॉन एसी दोन्ही गाड्या असतील. तसेच ही प्रक्रिया नियोजनाच्या टप्प्यात आहे आणि विभाग लवकरच त्याच्या व्यवहार्यतेची चाचणी घेणार आहे.

कोणत्याही परिस्थितीत, कोरोना नियमांच्या तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना या प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. मुंबई लोकल ट्रेनमधील सध्याच्या नियमांचे पालन करून अधिकारी मेमू सेवांवरील प्रवाशांना तिकीट व पास जारी करत आहेत.

वसई-पनवेल दरम्यान मेमू सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय

तसेच दुसरीकडे, मुंबई विभागाच्या वसई रोड-दिवा-पनवेल विभागादरम्यान मेनलाइन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (MEMU) सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. अहवालात म्हटले आहे की लॉकडाऊनमुळे सेवा 2020 मध्ये बंद करण्यात आली होती.म्हणून ती सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वारंवार केली जात होती. हे लक्षात घेऊन, ही सेवा शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 पासून पुन्हा कार्यान्वित होणार आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments