फेमस

Mahalakshmi Temple Mumbai : जेव्हा ब्रिटिशांनी महालक्ष्मी मंदिरासाठी ब्रीच कँडीचा रस्ता बांधला…

त्यापैकीच एक मंदिर म्हणजे मुंबईतील 1831 साली बांधण्यात आलेले  श्री महालक्ष्मी मंदिर या मंदिरात प्रामुख्याने तीन देवींच्या मूर्ती आहेत.

Mahalakshmi Temple Mumbai : मुंबईत अनेक प्रसिद्ध ठिकाण आहेत.मुंबईतील देवस्थानही तितकीच लोकप्रिय व प्राचीन  आहेत.त्यापैकीच एक मंदिर म्हणजे मुंबईतील 1831 साली बांधण्यात आलेले  श्री महालक्ष्मी मंदिर या मंदिरात प्रामुख्याने तीन देवींच्या मूर्ती आहेत. श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या तीन देवींचे दर्शन घेता येईल.त्या तीन मूर्ती सोन्याच्या व मोत्यांच्या दागिन्यांनी आकर्षकपणे सजवलेल्या आहेत.(When the British built the Breach Candy Road for the Mahalakshmi Temple …)

नवरात्र उत्सव आता चालू होणार आहेत,त्यातच महाराष्ट्रातील मंदिरेही या शुभमुहूर्तावर खोलण्यात येणार आहेत.तर तुम्ही नक्कीच मुंबईतील प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराला भेट द्या.

 मुंबईतील या मंदिराच्या मागील बाजूस समुद्र आहे,तर मंदिराच्या सभोवतालात बसण्याची व्यवस्था ही केलेली आहे.महालक्ष्मी मंदिर परिसर हे सुंदर वास्तुशिल्प, पुरातत्त्व मूल्य, पारंपारिक मंदिरांनी वेढलेले आहे.अनेक सुंदर ऐतिहासिक वसाहतींचा वारसा व सुंदर घरगुती वास्तुकला येथे पाहायला मिळते.

मंदिराचा इतिहास अतिशय रोचक आहे. जेव्हा ब्रिटिशांनी महालक्ष्मी परिसर हा  वरळी परिसराशी जोडण्यासाठी ब्रीच कँडी रस्ता बांधण्याची योजना आखली होती, तेव्हा समुद्राच्या वादळी लाटांमुळे संपूर्ण योजना विस्कळीत होण्याच्या वाटेवर होती. परंतु तेथील ठेकेदार रामजी शिवाजी यांच्या स्वप्नात महालक्ष्मी दिसली व  देवीने याच्या स्वप्नात समुद्रपातळीवरून देवींच्या तीन मूर्ती बाहेर काढून मंदिरात बसवण्याचा आदेश दिला. तेव्हा तस घडलेही आणि ब्रीच कँडी रस्त्याचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण झाले. म्हणून भाविक खूप श्रद्धेने देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात.व असे मानले जाते की देवीचे दर्शन केल्याने आपली इच्छा पूर्ण होते.

मुंबईचे ऐतिहासिक माता मंदिर, 300 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. तसेच हे मंदिर आणखी अनेक ऐतिहासिक मंदिरांनी वेढलेले आहे.श्री महालक्ष्मी मंदिर सकाळी 6 ला उघडते व रात्री 10 ला शेवटची आरती झाल्यानंतर बंद होते.हे मंदिर सोमवार ते रविवार भाविकांसाठी चालू असते.श्री महालक्ष्मी मंदिर भुलाभाई देसाई रोड, महालक्ष्मी पश्चिम मुबंई येथे आहे.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments