Maharashtra Updated : गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गर्दी केला तर याद राखा; दुसऱ्या दिवसांपासून….
गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी निर्बंध लावण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत.

Maharashtra Updated : 10 सप्टेंबरपासुन गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, गेल्या वर्षीप्रमाणे याहीवर्षी निर्बंध लावण्याच्या सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला दिल्या आहेत. (Ganeshutsav) महाराष्ट्रामध्ये नवे निर्बंध लागू करणार नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार( ajit pawar ) यांनी दिली. त्यामुळे आता राज्य सरकार गणेशोत्सवात निर्बंध लावणार का? असा प्रश्न असताना अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी चर्चा केली. यावेळी त्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्यानं निर्बंध लादणार का? (Covid restrictions ) असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन निर्बंधांवर चर्चा झाली असून आम्ही नवीन निर्बंध लागू करणार नाही. कारण मोठ्या गणेश मंडळांनी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करणार असल्याने निर्बंध लागू केले जाणार नाहीत. सर्वांनी घरीच साध्या पद्धतीने गणेशउत्सव साजरा करावा.अनेक ठिकाणाहून वेगवेगळे देखावे पाहण्यासाठी लोक येतात पण यावेळी देखावेच नसल्यामुळे गर्दीचं होण्याचा प्रश्नच नाही. 10 सप्टेंबरला ( 10 September) पहिल्या दिवशी गर्दी दिसली तर दुसऱ्या दिवशी कठोर निर्णय घेतला जाईल. तशी वेळ कोणी येऊ देऊ नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.
मास्कचा वापर न केल्याने आणि गर्दी निर्माण केल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यात घरंच्या घरं पॉझिटिव्ह झाल्याचं पाहायला मिळाली आहेत. त्यामुळे काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, रुग्णसंख्या वाढत असेल तर निश्चितपणे पुन्हा कठोर( strictly restrictions) भूमिका घेतली जाईल, असं अजित पवार म्हणाले.
;
View this post on Instagram