फेमस

Mahim Fort : मुंबईतील पूरातन किल्ला कोणता, त्याच्या लढाईची थरारक कहाणी माहिती आहे का?

मुंबईत सर्वात पुरातन किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला होय.

Mahim Fort : आपण आजवर महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या असतील परंतु मुंबईत असलेल्या माहीमच्या पुरातन किल्ल्याला तुम्ही कधी भेट दिली आहे का?या किल्ल्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग माहीमच्या किल्ल्याबद्दल जाणून घेऊया.Which is the oldest fort in Mumbai, do you know the thrilling story of its battle?

20210909 121901

मुंबईत सर्वात पुरातन किल्ला म्हणजे माहीमचा किल्ला होय. हा किल्ला मुंबईच्या पूर्व-पश्चिम किनार्‍यांना जोडणारा तसेच या किल्ल्याच्या दक्षिणेकडे वरळी असून उत्तरेला वांद्रे आहे.हा किल्ला माहीमच्या खाडीचे रक्षणही करत आहे. तसेच या किल्ल्याला जलमार्गाचा द्वाररक्षक म्हणून ही ओळखले जाते.

मुंबईच्या बेटांना मुख्य जमिनीपासून वेगळ्या करणार्‍या महकावती उर्फ माहीमच्या खाडीच्या मुखावर इ.स 1140 मध्ये प्रतापबिंब राजाने माहीमचा किल्ला बांधला होता.तसेच या राजाने आपली राजधानीही माहीम येथे वसवली होती. त्याठिकाणी नाना जातीचे व नाना प्रकारचे व्यवसाय करणार्‍या लोकांना बोलावून व्यापार, उदीम, शास्त्र व अनेक संस्कृतीची बीजे मुंबई बेटावर रुजवली.

हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आल्यावर इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर यांनी सध्या अस्तित्वात असलेला किल्ला नव्याने बांधला. इ.स 1672 मध्ये पोर्तुगिजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ला 100 सैनिक व 30 तोफांनी सज्ज होता.त्यामुळे पोर्तुगिजांना तो जिंकता आला नाही. त्यानंतर 14 फेब्रुवारी 1689 रोजी जंजिर्‍याच्या सिध्दी याकूत खानाने 2500 सैनिकांना घेऊन मुंबईवर हल्ला चढवला. त्याने माहीमचा किल्ला त्या हल्ल्यात मिळवला व सर्व मुंबईच्या भागात लुटालुट केली. परंतु त्याच्या कडून इंग्रजांनी किल्ला परत जिंकून घेतला.

या किल्ल्याच्या चारी ही बाजूंनी मजबूत तटबंदी असून, बुरुजांचे संरक्षण लाभले आहे. या किल्ल्याचे प्रवेशद्वार ब्रिटिशांनी बांधलेल्या स्थापत्यकलेची साक्ष देत उभे आहेत. त्यावरील कलाकुसर व दोन्ही बाजूचे उठावदार खांब ही त्याठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. माहीम किल्ल्यात झालेल्या अतिक्रमणामुळे व सभोवताली असलेल्या झोपडपट्टीमुळे या किल्ल्यात बाकी काहीही पहाता येत नाही.

20210909 121814

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments