आपलं शहरफेमस

Manibhavan Museum : मुंबईतील महात्मा गांधीजींचे निवस्थान तुम्ही पाहिले आहे का? पाहा कशाप्रकारे आहे खास

या ठिकाणी एक अनामिक शांतता आणि प्रसन्नता तुम्हाला मिळू शकते.तुम्ही या निवस्थानाला एकदा नक्की भेट द्या.

Manibhavan Museum :   तुम्ही मुंबईतील गांधीजींच्या निवस्थानाला कधी भेट दिली आहे का? मुंबईतील या ऐतिहासिक ठिकाणी गांधीजी जवळपास 17 वर्ष राहिले होते. जगाला अंहिसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींंच्या मुंबईतील निवासस्थानाचे नाव मणि भवन आहे.या ठिकाणी एक अनामिक शांतता आणि प्रसन्नता तुम्हाला मिळू शकते.तुम्ही या निवस्थानाला एकदा नक्की भेट द्या.(Have you seen the residence of Mahatma Gandhi in Mumbai? See how special it is)

मणि भवन येथे महात्मा गांधींनी असहकार, सत्याग्रह, स्वदेशी, खादी व खिलाफत चळवळ यांसारख्या चळवळींचे नियोजन येथूनच केले होते.मणि भवन हे 1917 ते 1934 दरम्यान गांधीजींच्या मुंबईतील राजकीय कार्यांचे केंद्रबिंदू होते.

या संग्रहालयात गांधीजींच्या जीवनाचे वर्षानुवर्ष प्रतिनिधित्व करणाऱ्या वास्तू ठेवल्या आहेत.त्यांच्या जीवनाचा वास्तववादी देखावा आपल्याला या संग्रहालयात दिसेल. हे सर्व देखावे हृदयस्पर्शी व सांस्कृतिक अनुभव देणारे आहेत. मणि भवन हे एक स्मारक आहे ज्यात लायब्ररी, पिक्चर गॅलरी व मेमोरबिला आहे.

याच ठिकाणी महात्मा गांधींनी 1921 मध्ये मुंबईत शांतता प्रस्थापित करण्यासाठी चार दिवसांचे उपोषण केले होते.या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका सभागृहात गांधीजींचे चित्रपट प्रदर्शित केले जातात.येथे शाळा आणि महाविद्यालयांसाठी चर्चासत्रे, व स्पर्धा देखील सभागृहात आयोजित केल्या जातात.

या संग्रहालयात आजही तुम्हाला गांधीजीच्या जीवनावर आधारीत पुस्तके, त्यांची लेखनसामुग्री, चरखा व ते वापरत असलेल्या वस्तू ,महात्मा गांधी आणि संबंधित विषयांवरील संशोधन ग्रंथालयातून 20,000 पुस्तके, नियतकालिके व त्यांच्या भाषणाचे रेकॉर्डिंग इत्यादी सर्व वस्तू या संग्रहालयात जतन करून ठेवल्या आहेत. तसेच 4 जानेवारी 1932 रोजी ज्या टेरेसवर त्यांना अटक करण्यात आली होती, त्यांच्या अटकेचा एक कांस्य शिलालेख अजूनही या संग्रहालयात ठेवला आहे.

ही ऐतिहासिक वास्तू मुंबईच्या ग्रॅंट रोडच्या गावदेवी विभागातील लॅबर्नम रोडवर आहे.येथे जाण्यासाठी प्रवेश शुक्ल आकारला जात नाही.हे संग्रहालय आठवडाभर पर्यटकांसाठी खुले असते.हे संग्रहालय सकाळी 9:30 वाजता उघडते आणि सायंकाळी 6 वाजता बंद केले जाते.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments