नॅशनल

Manoj Patil : कोण आहे बॉडिबिल्डर, ‘मिस्टर इंडिया’ मनोज पाटील, आत्महत्येचा प्रयत्न का केला?

29 वर्षीय मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मनोज पाटील सध्या कूपर रूग्णालयात दाखल आहे.

Manoj Patil : 29 वर्षीय मनोजने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.( Suscid attempt)  मनोज पाटील सध्या कूपर रूग्णालयात दाखल आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोज पाटीलने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. बुधवारी रात्री मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ( Wednesday night)

मनोज पाटीलने अभिनेता साहिल खानवर गेल्या ( Sahil khan ) अनेक दिवसांपासून छळ करत असल्याचा आरोप केला आहे.मनोज पाटील याने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनोज पाटील याचे कुटुंबीय मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

मनोज पाटील याने आत्महत्येसारखं पाऊल उचलण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये त्याने अभिनेता साहिल खान आपल्याला गेल्या अनेक दिवसांपासून त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियात बदनामी करतो त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचं मनोजने म्हटलं आहे. पत्नी आणि माझ्यात असलेल्या वादाचा फायदा घेत आणि पत्नीची दिशाभूल करत तो सतत माझं करियर संपविण्याची धमकी मला देत आहे…’ असं मनोजने सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे.

मनोज पाटील याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय( national and international sports)  पातळीवर अनेक स्पर्धांत भाग घेतला आहे. ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments