आपलं शहरघटना

Mumbai Airport : फ्रॉड कॉलमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भितीचे वातावरण, पहा काय आहे प्रकरण….

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच टर्मिनल २ म्हणून ओळखतो त्या विमानतळावर असाच काहीसा प्रकार घडला आहे.

Mumbai Airport : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याला आपण छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणजेच टर्मिनल २ म्हणून ओळखतो त्या विमानतळावर असाच काहीसा प्रकार घडला आहे.मुंबई पोलीस वाहतूक नियंत्रण कक्षाला मंगळवारी दुपारी एक फ्रॉड कॉल आला ज्यामधे मुंबई विमानतळावरील 16 कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात असल्याचा दावा करण्यात आला. Fear call scares Mumbai International Airport, see what’s the matter

अंधेरी (पूर्वेकडील) सहार पोलीस ठाण्यातील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “एका व्यक्तीने मंगळवारी दुपारी 3 च्या सुमारास मुंबई वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील 16 कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. फोन करणार्‍या व्यक्तीने ही धमकी देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय शाखेला होती का याचा उल्लेख केला नाही. त्यामुळे स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा, एटीएस, बॉम्ब पथक, क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) कर्मचारी सेवेत रुजू झाले. त्यांनी विमानतळाच्या आत सर्व संवेदनशील ठिकाणी शोधमोहीम राबवली पण मात्र काहीही सापडले नाही.

तरीही, अज्ञात व्यक्तींविरोधात आयपीसीच्या कलम 505 (सार्वजनिक गैरसमज) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. सहार पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनकर शिळवटे यांनी सांगितले की, “फसवा फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी चौकशी सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments