Mumbai attack : 12 मार्च, 12 ठिकाणी स्फोट, शेकडो जणांचा मृत्यू, पहा कसा घडला मुंबई हल्ला
12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकापाठोपाठ 12 बॉम्बस्फोट झाले. या साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेला 28 वर्ष पूर्ण झाली आहेत.

Mumbai attack : 12 मार्चची घटना ही मुंबईसह संपूर्ण देशाला हादरून टाकणारी होती. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत एकापाठोपाठ 12 बॉम्बस्फोट झाले. या साखळी बॉम्बस्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. या घटनेला 28 वर्ष पूर्ण झाली आहेत. या बॉम्बस्फोटामध्ये मुंबईत एकूण 257 लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर अंदाजे 800 नागरिक जखमी झाले होते.(March 12, blasts at 12 places, killing hundreds, see how the Mumbai attacks happened)
या साखळी स्फोटांमध्ये एकूण 27 कोटींची मालमत्ता नष्ट झाली. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी 129 लोकांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते, तर 2007 साली टाडा कोर्टाने 100 लोकांना या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. आरोपी याकूब मेमनला 2015 मध्ये याच प्रकरणात फाशी देण्यात आली होती. या सर्व प्रकरणामध्ये कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमकडे या हल्ल्याची सूत्रे असल्याचे बोलले जात होते. तर दाऊद इब्राहिम हा 1995 पासून फरार आहे. या स्फोट मालिकेत गुन्हेगार अबू सालेम आणि अभिनेता संजय दत्त ही सामील असल्याची माहिती मिळाली होती.
स्फोटांची मालिका
पहिला स्फोट हा मुंबई शेअर मार्केट इमारतीच्या तळमजळ्यावर दुपारी 1.30 च्या सुमारास झाला होता. यात एकूण 84 जणांचा मृत्यू झाला, तर 217 जण जखमी झाले.
दुसरा बॉम्बस्फोट हा नरसी नाथा स्ट्रीट, कथा बाजार, येथे दुपारी 1.15 ला झाला. येथे ही 4 जण ठार, तर 16 जण जखमी झाले.
तिसरा स्फोट हा पेट्रोल पंप, शिवसेना भवन, येथे दुपारी 2.30 च्या सुमारास झाला. त्यात 4 जण मृत्यू तर 50 जण जखमी झाले.
चौथा स्फोट एअर इंडिया इमारत, नरिमन पॉईंट, येथे दुपारी 2.33 ला घडवण्यात आला. यात 20 जण मृत्यूमुखी पडले तर 87 लोक जखमी झाले.
सेंच्युरी बाझार, वरळी येथे पाचवा बॉम्बस्फोट करण्यात आला. हा स्फोट दुपारी 2.25 ला झाला. यात जवळपास 113 लोक ठार झाले तर 227 लोक जखमी झाले.
सहावा स्फोट मच्छीमार वसाहत, माहीम येथे दुपारी 2.45 च्या सुमारास झाला. यात 3 जण ठार, तर 6 जण जखमी झाले.
सातवा स्फोट दुपारी 3.05 ला झवेरी बाझार येथे झाला होता. यात 17 जण ठार, तर 57 जण जखमी झाले.
हॉटेल सेना रॉक, बांद्रा येथे आठवा बॉम्बस्फोट दुपारी 3.10 च्या आसपास झाला. सुदैवाने येथे कोणतीही जीवितहानी झाली.
नववा स्फोट हा प्लाझा सिनेमा, दादर येथे झाला. हा स्फोट दुपारी 3.13 ला झाला. या स्फोटात 10 लोक मारले गेले, तर 37 लोक जखमी झाले.
दहावा बॉम्बस्फोट दुपारी 3.20 च्या सुमारास हॉटेल जुहू सेंटर, येथे झाला, त्यात 3 जण जखमी झाले.
अकरावा स्फोट सहार विमानतळाजवळ दुपारी 3.30 ला झाला. सुदैवाने येथेही जीवितहानी झाली नव्हती.
बारावा बॉम्बस्फोट हा हॉटेल एअरपोर्ट सेंटर, येथे दुपारी 3.40 च्या आसपास झाला. या स्फोटात 2 लोक मारले गेले, तर 8 लोक जखमी झाले.
अशाप्रकारे 12 मार्च 1993 च्या साखळी बॉम्बस्फोट हल्ल्याची थरारक भीषणता दुपारी 1.30 वाजेपासून 3.40 पर्यंत म्हणजेच दोन तास 12 मिनिटे एकापाठोपाठ 12 स्फोट मुंबईत घडवून आणले.
हे ही वाचा :
- 26/11 Mumbai Diary : 26/11 च्या हल्ल्यात सरकारी रुग्णालय झालं होतं युद्धभूमी, पहा मुंबई डायरीतून काय दाखलंय
- मुंबईत 916 कोटींचा घोटाळा, कोण आहे IDBI Bank ला गंडवणारा विनोद चतुर्वेदी? | ED arrests Vinod Chaturvedi
- lady slapped Shah Rukh Khan | मुंबईत येताच महिलेकडून खाल्ली थप्पड, शाहरुखचं असं जंगी स्वागत का झालं होतं…