Mumbai Cricket History : कोण आहे चंदू बोर्डे, मुंबई संघाला नाचवलं होतं स्वत:च्या तालावर, पाहा साताऱ्यात रंगलेला धमाकेदार सामना
सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्याला आपण रणजी ट्रॉफी सामना म्हणून ओळखतो

Mumbai Cricket History : सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशन ज्याला आपण रणजी ट्रॉफी सामना म्हणून ओळखतो, हा सामना 16, 17, 18 जानेवारी 1965 साली मुंबई विरुद्ध महाराष्ट्र या दोन धडाकेबाज संघात खेळला गेला होता. हा सामना मुंबई संघाने जिंकला होता. या सामन्यात मुंबई संघाचे कर्णधार बापु नाडकर्णी तर उपकर्णधार हे शरद दिवाडकर हे होते. इतर खेळाडू हे फलक इंजिनीअर, दिलीप सरदेसाई, मनोहर हर्डीकर, रमाकांत देसाई, अशोक मनकड, वासु परांजपे, अरून बर्वे, उमेश कुलकर्णी, एस व्ही मोरे, बाळू गुप्ते, अजीत वाडेकर, सुधीर नाईक हे सर्व होते. महाराष्ट्र संघाबद्दल सांगायच तर कर्णधार चंदू बोर्डे हे कप्तान होते, चंदू बोर्डे हे 1958 ते 1970 पर्यंत भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू होते. त्यानंतरही त्यांनी संघाचे प्रशिक्षक आणि मॅनेजर म्हणून महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
तर इतर खेळाडूंपैकी नाना जोशी, विजय भोसले, शेर मोहम्मद, अविनाश जोशी, बाबा सिधये, सदानंद मोहोळ, हेमंत कानेटकर, मधु गुप्ते, ज्ञानेश्वर अगाशे, दत्ता खेर, हेमंत मोरे, तोडलबाजी गौरपपा, पांडव हे होते.
मुंबई विरुद्ध महाराष्ट्रची मॅच सातारा येथे झाली होती.
मुंबई संघात जवळपास 10 कसोटी खेळणारे खेळाडू होते. संघात 13 व्या क्रमांकावर अजित वाडेकर होते. या मजबूत संघाच्या विरोधात महाराष्ट्र संघाने कडवी झूंज दिली होती. त्याकाळात क्रिकेटला महत्त्वाचे स्थान देण्याचे काम ज्या खेळाडूंनी केले, त्यात चंदू बोर्डे यांचे नाव कायम लक्षात ठेवावे लागेल.
हा सामना पश्चिम क्षेत्रात वर्गीकृत केला जातो. या सामन्याचा निकाल जर आपण बघितला तर मॅच ड्रॉन असा आहे, त्याचे कारण जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला, तर मुंबई आणि महाराष्ट्रात या दोन्ही संघाची कामगिरी ही अविस्मरणीय होती. या संघात कामगिरी बजावणाऱ्या सर्व खेळाडूंना भारत सरकारकडून क्रिकेट बोर्डामार्फत 35 हजार रुपयांची पेंशन मिळत असते.
1964 साली रणजी क्रिकेट सामन्यात 1604 धावा बनविण्याचा विक्रम चंदू बोर्डे यांच्या नावावर आहे. त्यांचा हा विक्रम 50 वर्षानंतर चेतेश्वर पुजाराने मोडला आहे. चंदू बोर्डे यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की आम्ही जेव्हा मैदानावर खेळत असायचो, आमचे लक्ष हे पूर्ण 5 दिवसांचे असायचे, त्यावेळी एका टेस्ट मॅचमध्ये प्रति दिवस प्रत्येक खेळाडूला 250 रूपये देण्यात यायचे, एकदा त्यांनी टेस्ट मॅच 4 दिवसांत जिंकली होती तर त्यांना 200 रुपये मिळाले होते.
चंदू बोर्डेंचे क्रिकेट करिअर :
टेस्ट सामने : 55 त्यामध्ये 3061 धावा केल्या, तर 52 विकेट्स घेतले
प्रथम क्लास : 251 सामने, 12 हजार 805 धावा, 331 विकेट्स