क्राईम

29 मित्रांकडून 14 वर्षांच्या चिमुकलीवर आत्याचार, आधी बनवला न्यूड व्हिडीओ, नंतर… | Mumbai Crime

, 14 वर्षांच्या चिमुरडीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे.

Mumbai Crime | गुरुवारी, 23 सप्टेंबर रोजी डोंबिवली भागात एक धक्कादायक घटना घडली आहे, 14 वर्षांच्या चिमुरडीवर 29 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर येत आहे. त्यामुळे मुंबईसह मेट्रो भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील स्त्रियांच्या सुरशिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

डोंबिवलीमध्ये झालेल्या या प्रकरणात पोलिसांनी 24 जणांना अटक केली आहे, तर इतर काही जणांचा शोध सुरु आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्ता कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी त्यात अल्पवयिन मुलीचे मित्र होते. त्या सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे. आत्याचार करणाऱ्यांपैकी 2 आरोपी हे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान आत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुख्य आरोपी हा अल्पवयीन मुलीचा मित्र असून त्याने सर्वप्रथम जानेवारी महिन्यात तिचा बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनविल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर, इतर आरोपींनी त्याच व्हिडिओचा वापर करून मुलीला ब्लॅकमेल केले आणि डोंबिवली, बदलापूर, रबाळे आणि मुरबाडसह विविध ठिकाणी तिच्यावर अनेक प्रसंगी आत्याचार केले. दरम्यान पीडितेने बुधवारी रात्री पोलिसांशी संपर्क साधला त्यानंतर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय दंड संहितेनुसार कलम 376 (बलात्कार), 376 (एन), 376 (3), 376 (डी) (ए) आणि कलम 4,6 आणि 10 नुसार लैंगिक आत्याचार केल्याचे गुन्हे आरोपींवर लागू करण्यात आले आहेत.

(POCSO) कायद्या अंतर्गत कल्याण सत्र न्यायालयाने अटक केलेल्या 24 आरोपींना 29 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. इतर दोन आरोपी, जे अल्पवयीन आहेत, त्यांना भिवंडी रिमांड होममध्ये पाठवण्यात आले आहे.

या सर्व झालेल्या घटनेवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. त्यात ते म्हणाले की, दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. “सरकारने या घटनांना गांभीर्याने घेऊन अशा घटनांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी फडणवीसांनी केली आहे.

हेही वाचा…

मुंबईत 916 कोटींचा घोटाळा, कोण आहे IDBI Bank ला गंडवणारा विनोद चतुर्वेदी?

दहशतवादी मुंबईत; पण टीप दिल्ली पोलिसांना कशी? काय आहे कारण…

Mumbai Crime : मुंबईमध्ये सगळ्यात सुरक्षित महिला, मात्र 2021 मुळे संपूर्ण महाराष्ट्र हदरला…

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments