फेमस

Mumbai Historical News:काय आहे एलिफंटा लेणीमध्ये खास, जागतिक वारसा स्थळ म्हणून का आहे ओळख…

या एलिफंटा गुफांचे ऐतिहासिक महत्वं लक्षात घेऊन 1987 साली युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या गुफांची नोंद केली आहे.

Mumbai Historical News :अवघ्या विश्वात प्रसिद्ध असलेल्या एलिफंटा गुफा ही महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई पासून अवघ्या काही अंतरावर घारपुरी द्वीपावर आहेत. एलिफंटा  लेणीला घारापुरी लेणी (Gharapuri Leni) म्हणून सुद्धा संबोधले जाते. गेट वे ऑफ इंडियावरून दुरूनच नजर टाकली की समुद्राच्या कुशीत वसलेले हे ठिकाण अंधुक किंवा धूसर का होईना पण नजरेत भरते.What is why Elephanta Caves is recognized as a special, World Heritage Site

एलिफंटा लेणीला मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरूनच जाता येतं.समुद्राच्या लाटांवर हेलकावे खात, आजूबाजूला उभ्या असलेल्या युद्ध नौका, मालवाहू नौका आणि लहान-मोठय़ा अनेक बोटी, दूर जात चाललेली मुंबई, तारापूरचं अणुभाभा केंद्र.. मधूनच बोटीजवळ येणारे पांढरेशुभ्र समुद्रपक्षी अशा सगळ्या गोष्टी पाहत चाळीस मिनिटांचा बोटीचा प्रवास संपवून आपण नितांत रमणीय अशा घारापुरी बेटावर कधी येऊन पोहोचतो ते कळतच नाही.

भगवान शंकराला समर्पित असलेल्या या गुफांमध्ये शिवाच्या तीन भव्य मूर्ती आपल्याला पहायला मिळतात. भारतातील प्रमुख ऐतिहासिक आणि महत्वांच्या पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या या भव्य गुफा 2 वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. या गुफांच्या एका भागात हिंदू धर्माशी जोडल्या गेलेल्या गुफा असून अन्य भागात बौद्ध धर्माशी संबंधित गुफा आढळतात.या एलिफंटा गुफांचे ऐतिहासिक महत्वं लक्षात घेऊन 1987 साली युनेस्को ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या गुफांची नोंद केली आहे.

महाराष्ट्र, मुंबई पासून 10 कि.मी दूर स्थित प्रसिद्ध एलिफंटा लेणी 60 हजार चौरस फूट परिरासात पसरली आहेत. त्या परिसरामध्ये एकूण 7 लेण्या आहेत, त्यातील 5 लेण्या या हिंदू धर्माशी संबंधित आहेत, इतर दोन लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत.घारपुरी द्वीप येथे स्थित असलेल्या गुफांमधील  पहिल्या क्रमांकाची गुफा  ही ‘ग्रेट गुफा’ या नावाने ओळखली जाते. या गुफेत भगवान शिवाच्या अनेक मूर्ती असून मध्यभागी शिवाची त्रिमूर्ती स्थापित करण्यात आली आहे. या मूर्तीला सदाशिव या नावाने ओळखले जाते.

या गुफेत भगवान शिव गंगेला धरतीवर आणतांनाचे दृश्य दाखवणारी मूर्ती देखील विराजित करण्यात आली आहे.क्रमांक 2  ते 5 या गुफांना कैनन हिल नावाने ओळखले जाते. 6 वी आणि 7 वी गुफा स्तूप हिल्स असून 6  व्या गुफेला सीताबाई गुफा देखील म्हणतात.7 व्या गुफेसमोर एक तलाव असून तो ‘बौद्ध तलाव‘ या नावाने ओळखला जातो.

पंधराशे वर्षापूर्वी खोदण्यात आलेल्या या लेण्या पाहून त्या काळात आपल्या देशातील कला आणि संस्कृती किती उच्च पातळीवर होती याची कल्पना येते. त्या कोरलेल्या लेण्या पाहून मनोमन त्या कारागिरांना दाद देऊन आपण परतीच्या प्रवासाला लागतो. एक नितांत सुंदर, रमणीय असा परिसर पाहून आल्याचं समाधान आपल्याला निश्चितच लाभेल.

हे ही वाचा :

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments