स्पोर्ट

Mumbai Indians : IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स नेहमी का हरते? काय आहे शास्त्र…

मात्र IPL च्या इतिहासात अशा अनेक सामन्यांची नोंद आहे, जे सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत,

Mumbai Indians : आयपीएल टी-20 क्रिकेट लीग मधील पहिला सामना मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा गमावला. संथ गतीने फॉरमॅटमध्ये परतणे, हे मुंबई इंडियन्ससाठी (MI) वेगळी गोष्ट नाही, मात्र IPL च्या इतिहासात अशा अनेक सामन्यांची नोंद आहे, जे सामने मुंबई इंडियन्सने गमावले आहेत, त्यात ते अनेकदा चेन्नई सुपर किंग्ससोबत किंवा इतर संघासोबत पहिला सामना पराभूत झाले आहेत.(Why did Mumbai Indians lose its first IPL match)

मुंबई इंडियन्सची मालकी रिलायन्स इंडस्ट्रीज या भारतातील सर्वात मोठ्या खाजगी कंपनीकडे आहे. मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील टॉप रेटेड संघ आहे. या संघाची स्थापना 13 वर्षांपूर्वी 24 जानेवारी 2008 मध्ये झाली होती. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा आयपीएल क्रिकेट कप जिंकला आहे. पहिला सामना 2013 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करत जिंकला, दुसर्‍यावेळी मुंबई इंडियन्सने 2015 साली चेन्नई सुपर किंग्जला पराभूत करून विजय मिळविला. तिसऱ्या वेळेला 2017 साली रायझिंग पुणे सुपरजायंट संघावर मात देऊन विजय मिळविला. चौथ्यावेळी 2019 साली चेन्नई सुपर किंग्ज संघाचा पराभव करत अंतिम सामन्यात विजय मिळविला आणि 2020 साली दिल्ली कॅपिटल या संघाला पराभूत करून विजय प्राप्त करण्याचे मानांकन देखील मुंबई इंडियन्स संघाकडे आहे. (Why Mumbai Indian never win a first match of IPL?)

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा आजवरचा सर्वात यशस्वी संघ असला तरी संघाच्या नावावर एक अवांछित रेकॉर्ड आहे. पाच वेळा जेतेपद पटकावूनही, मुंबई इंडियन्स 2013 नंतर स्पर्धेचा पहिला गेम जिंकू शकली नाही.

आजपर्यंत मुंबई इंडियन्सने हारलेले पहिले सामने आपन बघुया

1. मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 20 एप्रिल 2008 साली झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने पराभव पत्करला.

2. मुंबई इंडियन्स विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 4 एप्रिल 2013 साली बंगळूर येथे झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने पराभव पत्करला.

3. 16 एप्रिल 2014 साली झालेल्या मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्स संघाने मुंबईवर 41 धावांनी विजय मिळविला.

4. 8 एप्रिल 2015 साली देखील मुंबई इंडियन्स विरूद्ध कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सामना झाला, ह्या सामन्यात कोलकाताने मुंबईवर 7 गडी राखून विजय मिळविला.

5. 9 एप्रिल 2016 रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने रायझिंग पुणे सुपरजायंट विरुद्ध 1 गडी राखून पराभव पत्कारला.

6. 6 एप्रिल 2017 रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पुणे संघाकडून 7 गडी राखून पराभव झाला.

7. 7 एप्रिल 2018 रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात चेन्नई संघाने मुंबईवर 1 गडी राखून विजय मिळविला.

8. 24 मार्च 2019 रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा दिल्ली कॅपिटल्स संघाकडून 37 धावांनी पराभव झाला.

9. 19 सप्टेंबर 2020 रोजी आबुधाबी येथील सामन्यात चेन्नई संघाकडून मुंबईचा 5 गडी राखून पराभव झाला.

10. 19 सप्टेंबर 2021 रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून 20 धावा राखून पराभव झाला.

आपण बघितल्याप्रमाणे बर्याचदा मुंबई इंडियन्स संघ हा IPL चा पहिला सामना पराभूत होतो. त्यामागील कारणे काय असु शकतात? याचाच आढावा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

कुठलाही क्रिकेट संघ हा सामना खेळण्यासाठी सराव करत असतो. मुंबई इंडियन्सचीही अशीच काहीशी वैशिष्ट्ये आहेत, मुंबई इंडियन्स हा संघ प्रत्येकवेळी सुरूवातीचे सामन्याचा सराव टेस्ट म्हणुन खेळत असतो. आयपीएल सामन्यात अनेक खेळाडू हे परदेशी आहेत, त्यामुळे लवकरात-लवकर समन्वय होणे हे सहज शक्य नसते, म्हणून पहिला सामना दरवेळी जिंकने हे एवढे महत्वाचे नसते, मात्र पहिल्या सामन्यात इतर खेळाडूंचे मनोबल वाढवणे, मैदानावरील लय एकसारखी करणे आणि ipl च्या स्टॅटर्जिचा सराव होण्याकडे मुंबई इंडियन्स संघाचा कल असतो, अनेकदा हाच समन्वय राखण्याच्या नादात मुंबईकडून पहिला सामना गमवला जातो.

 

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments