आपलं शहर

Mumbai Job Alert : मुंबई विद्यापीठात नोकरीची संधी विविध पदांसाठी भरती,कसे कराल अर्ज…

या भरतीमध्ये संचालक आणि प्राध्यापक  या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली असून पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Mumbai Job Alert : मुंबई विद्यापीठमध्ये विविध पदांसाठी भरती होणार आहे. विविध पदांच्या भरतीसाठी एक अधिसूचना जारी करण्यात आली आहे.या भरतीमध्ये संचालक आणि प्राध्यापक  या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली असून पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.मुंबई विद्यापीठ भरती 2021 अंतर्गत 05 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ महानगरपालिका भरती 2021  संचालक व प्राध्यापक या पदांमध्ये भरती होणार आहे.या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात.या पदांमध्ये एकूण 5 रिक्त जागा असून यात उमेदवाराचे शिक्षण PHD पदवी झालेली असावी. नोकरीचे ठिकाण हे मुंबई असणार आहे.

या पदांची निवड प्रक्रिया चाचणी किंवा मुलाखती द्वारे होणार आहे. पात्र उमेदवार रजिस्ट्रर, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक 25, फोर्ट, मुंबई – 400 032 या पत्त्यावर अर्ज पाठवू शकता.उमेदवार त्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकता, अर्जाची सुरुवात 11 सप्टेंबर 2021 पासून होणार आहे,तर अर्ज करण्याची शेवटची तारीख  29 सप्टेंबर 2021  असणार आहे.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

हे ही वाचा : 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments